शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

Sri Lanka Crisis : संकटात श्रीलंका, भारताच्या मदतीनं बदलतंय जीवन; आतापर्यंत 'इतक्या' कोटींची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 17:17 IST

Sri Lanka Crisis : आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेसाठी आता भारत धावून गेला आहे. कोट्यवधींच्या केलेल्या मदतीमुळे आता लोकांना दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी मदत मिळत आहे.

भारताचा शेजारी देश श्रीलंका (Sri Lanka Crisis) सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. तसंच श्रीलंकेवर दिवाळखोरीचा मोठ्या प्रमाणावर धोकाही आहे. चलनाचे मूल्य घसरल्याने अनेक महत्त्वाच्या वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. लोक डिझेल-पेट्रोल (Diesel-Petrol), गॅस (Gas) खरेदीसाठी लांबच लांब रांगा लावताना दिसत आहेत. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की सरकारला पेट्रोल पंपांवर सैन्याची तैनाती करावी लागले आहे. अशा भीषण परिस्थितीत श्रीलंकेला मदत करण्यासाठी भारत पुढे आला आहे. भारताच्या मदतीने श्रीलंकेतील लोकांना दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी मदत मिळतेय.

भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे. भारताने श्रीलंकेला जी ५०० मिलिन डॉलर्सची लाईन ऑफ क्रेडिटची (LoC) मदत केली आहे. त्यामुळे लोकांच्या गरजा पूर्ण होण्यास मदत मिळत आहे, असं त्यांनी नमूद केलंय. आपण सेंट्र कोलंबोच्या सेट्रल परिसरातील (Downtown Colombo) इंडियन ऑईलच्या पेट्रोल पंपावर पोहोचलो. एमडी मनोज गुप्ता यांनी इंधनाच्या पुरवठ्याच्या स्थितीबाबत माहिती दिली, असंही जयशंकर म्हणाले. ते मालदीवच्या दौऱ्यानंतर आता श्रीलंकेच्या दौऱ्यावर पोहोचले आहेत.पेट्रोल पंपावर लष्करइंधन खरेदीसाठी रांगेत उभे असलेल्या काही लोकांचा मृत्यू झाल्याचं वृत्त गेल्या आठवड्यात समोर आलं होतं. सध्या श्रीलंकेत पेट्रोल डिझेलचे दर वाढण्यासोबतच योग्य पुरवठाही होत नसल्यानं पेट्रोल पंपांवर मोठा रांगा पाहायला मिळत आहेत. हजारो लोक तासनतास रांगेत उभं राहून इंधन खरेदी करत आहेत. "अनेक तासांपर्यंत रांगेत उभं रागिल्यानंतर तीन ज्येष्ठ नागरिकांच्या मृत्यूच्या झालेल्या घटनेपश्चात पेट्रोल पंपांवर लष्कर तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे," अशी माहिती श्रीलंकन लष्कराचे प्रवक्ते निलांखा प्रेमारत्ने यांनी दिली.

सध्या श्रीलंकेतील परिस्थिती इतकी भीषण झाली आहे की अन्नधान्यासह अनेक आवश्यक वस्तूंची कमतरता भासत आहे. इतकंच नाही तर सरकारसमोर आर्थिक आणीबाणी लावण्याची परिस्थिती उद्भ्वताना दिसतेय. श्रीलंकेचं परकीय चलनही संपण्याच्या मार्गावर आणि चलनाचं मूल्यही विक्रमी घसरलंय. याशिवाय देशात तांदूळ आणि साखरेचीही कमतरता निर्माण झाली आहे. त्यातच साठेबाजांचाही प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :Sri Lankaश्रीलंकाIndiaभारतS. Jaishankarएस. जयशंकर