शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
3
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
4
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
5
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
6
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
7
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
8
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
9
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
10
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
11
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
12
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
13
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
14
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
15
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
16
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
17
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
18
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
19
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
20
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती

Sri Lanka Crisis : गॅस संपलाय, लाईटही गेलीय; सनथ जयसूर्याने सांगितली श्रीलंकेतील विदारक स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 08:06 IST

Sri Lanka Crisis :अर्जुना रणतुंगा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे कौतुक केले.

Sri Lanka Crisis : आर्थिक संकटामुळे श्रीलंकेतील (Sri Lanka Crisis) परिस्थिती सध्या बिकट होत चालली आहे. एकीकडे राजपक्षे सरकार सातत्यानं टीका होत आहे आणि आता श्रीलंकेतील जनतेला रस्त्यावर उतरावे लागले आहे. श्रीलंकेत महागाईने उच्चांक गाठला असून संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. श्रीलंकेचे माजी केंद्रीय मंत्री आणि क्रिकेट संघाचा माजी कर्णधार अर्जुन रणतुंगाने भारताचे आभार मानले होते. आता, माजी फलंदाज सनथ जयसुर्यानेही भारत हा आमचा 'मोठा भाऊ' असल्याचे म्हटले आहे.   

अर्जुना रणतुंगा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे कौतुक केले. भारताने श्रीलंकेला मदत केल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार तर मानलेच पण भारत हा श्रीलंकेचा मोठा भाऊ म्हणूनही उल्लेख केला. त्यानंतर, आता जयसुर्यानेही भारत हा मोठा भाऊ असल्याचे सांगत भारताचे आभार मानले आहेत. तर, श्रीलंकेतील विदारक परिस्थितीचे वर्णन करताना सरकारविरुद्ध आपला आवाज उठवला आहे. गॅस संपलाय, लाईटही गेलीय, असे म्हणत सध्याच्या परिस्थितीला विद्यमान सरकारच जबाबदार आहे. वेळीच परिस्थितीवर नियंत्रण न आल्यास, ही आपत्तीजन्य परिस्थिती बनेल, असेही जयसुर्याने म्हटले आहे.  आपल्या शेजारील देश आणि मोठा भाऊ म्हणून भारताने नेहमीच आम्हाला मदत केली आहे. आम्ही भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभारी आहोत. आमच्यासाठी, सध्याच्या परिस्थितीमुळे जगणे सोपे नाही. पण, भारत आणि इतर देशांच्या मदतीने आम्ही यातून बाहेर पडू, असा आशावाद सनथ जयसूर्याने व्यक्त केला.  दरम्यान, श्रीलंकेत, आर्थिक संकटाचा सामना करण्यात अपयशी ठरल्याबद्दल राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी पद सोडण्याची मागणी करताना मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरु निषेध करत आहेत. सध्या इतिहासातील सर्वात भीषण आर्थिक संकटाचा सामना श्रीलंकेला करावा लागत आहे. इंधन, स्वयंपाकाचा गॅससाठी लांबच्या लांब रांगा, जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा आणि तासनतास वीज खंडित होत असल्यामुळे जनता त्रस्त आहे. त्यामुळे श्रीलंका सरकारमध्येही खळबळ उडाली आहे. 

आणीबाणी जाहीर

आणीबाणी जाहीर केल्यानंतर श्रीलंकेतील परिस्थिती आणखी बिघडली आहे. एकीकडे राष्ट्रपती गाेटबाया राजपक्षे यांची सत्तेवरील पकड कमकुवत हाेत असल्याचे दिसत आहे. संसदेचे कामकाज सुरू झाल्यानंतर ४१ खासदारांनी सत्ताधारी आघाडीला दिलेला पाठिंबा मागे घेतला आहे. त्यामुळे राजपक्षे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

मोदींचे आभार सरकारवर टीका 

"जाफना विमानतळ सुरू करण्यासाठी भारताने मदत केली आणि त्यासाठी पंतप्रधान मोदींनी दयाळूपणा दाखवला. भारत आमच्यासाठी मोठा भाऊ आहे, भारताला आमच्या गरजा समजतात. या कारणास्तव भारताने पेट्रोल-औषध यांसारख्या गोष्टींचीही मदत केली आहे. येत्या काळात या सर्व गोष्टींची कमतरता भासू शकते," असं रणतुंगा म्हणाले. सध्याच्या राजपक्षे सरकारवर टीका करताना रणतुंगा म्हणाले की, "सध्याच्या सरकारमध्ये असे काही लोक आहेत ज्यांना समाजात फूट निर्माण करायची आहे. श्रीलंकेतील सध्याच्या परिस्थितीत सर्वत्रच समस्या आहे. त्याचबरोबर श्रीलंकेचे सरकार अहंकारी असल्यासारखे वागत आहे." सरकारमध्ये काही लोक आहेत ज्यांना हिंसाचार हवा आहे, असे होऊ नये. यासाठी मला खूप काळजी वाटते असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

टॅग्स :Sri Lankaश्रीलंकाprime ministerपंतप्रधानelectricityवीज