शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

Sri Lanka Crisis : श्रीलंकेत आंदोलकांचं 'सरकार'! राष्ट्रपती भवनात घेतली 'कॅबिनेट' बैठक, पंतप्रधानांच्या घरी केली पार्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 09:17 IST

Sri lanka crisis : या बैठकीत त्यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसोबतच, देशाच्या आर्थिक संकटावरही चर्चा केली. याशिवाय मॉक कॅबिनेट बैठकीत आंदोलकांनी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्या घरी झालेल्या जाळपोळीवरही चर्चा केली.

श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या सरकारी निवासस्थानावर, सरकार विरोधातील आंदोलकांनी कब्जा केला आहे. या आंदोलकांनी रविवारी एक बनावट कॅबिनेट बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसोबतच, देशाच्या आर्थिक संकटावरही चर्चा केली. याशिवाय मॉक कॅबिनेट बैठकीत आंदोलकांनी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्या घरी झालेल्या जाळपोळीवरही चर्चा केली.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसंदर्भातील मॉक मिटिंगमध्ये आंदोलकांनी एका परदेशी तरुणालाही सहभागी केले होते. हा परदेशी तरूण आंदोलकांनी राष्ट्रपतीभवनावर कब्जा केल्यानंतर तेथे फिरण्यासाठी गेला होता. याशिवाय, राष्ट्रपती भवनातील गोटबाया यांच्या बेडरूममध्ये, स्विमिंग पूलमध्ये आणि जिममध्ये आंदोलक मस्ती करतानाचे व्हिडिओदेखील सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहेत.

राष्ट्रपती गोटबाया अंडरग्राउंड? -आंदोलनाला शनिवारी हिंसक वळण मिळाल्यानंतर, राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी त्यांच्या अधिकृत निवासस्थानातून पळ काढला होता. ते सध्या कुठे आहेत? यासंदर्भात कसल्याही प्रकारची माहिती समोर आलेली नाही. श्रीलंकेतील अभूतपूर्व आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर संतप्त झालेल्या लोकांमुळे 73 वर्षीय गोटाबाया राजपक्षे, आपल्या कुटुंबासह भूमिगत झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

7 दशकांतील सर्वात वाईट काळ - सध्या श्रीलंकेला अभूतपूर्व आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. 22 दशलक्ष लोकसंख्या असलेला हा देश सात दशकांतील सर्वात वाईट काळ अनुभवत आहे. श्रीलंकेकडे परकीय चलनाची कमतरता असल्याने, तेथे इंधन आणि इतर आवश्यक वस्तूंचाही तुटवडा जाणवू लागला आहे. हे मुबलक प्रमाणावर खरेदी करण्यास तो असमर्थ आहे. अशा परिस्थितीत जनता रस्त्यावर उतरली आहे.

टॅग्स :Sri Lankaश्रीलंकाagitationआंदोलनEconomyअर्थव्यवस्थाPresidentराष्ट्राध्यक्ष