शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

Sri Lanka Crisis: श्रीलंकेत अराजक: राजपक्षेंच्या राजीनाम्यानंतर वडिलोपार्जित घर जाळले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 06:10 IST

पंतप्रधान राजपक्षे यांचा राजीनामा; खासदाराची आत्महत्या, देशभरात संचारबंदी केली लागू

कोलंबो : गेल्या दोन महिन्यांपासून आर्थिक अरिष्टाचा सामना करीत असलेल्या श्रीलंकेत अराजक निर्माण झाले आहे. सोमवारी श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी केलेल्या हल्ल्यांत १०० हून अधिक जण जखमी झाले. तर एका खासदाराने आत्महत्या केली. या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे, संतप्त नागरीकांनी चार खासदारांची घरे पेटवून दिली. याचबरोबर राजपक्षेंचे वडिलोपार्जित घर जाळण्यात आले आहे. 

स्वातंत्र्यानंतर प्रथमच आर्थिक आणीबाणीच्या संकटात सापडलेल्या श्रीलंकेत गेल्या दोन महिन्यांपासून अस्वस्थता आहे. अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महिंदा यांनी सोमवारी राजीनामा दिला. 

ट्विटरवर त्यांनी ही माहिती जनतेला दिली. त्यानंतर राजपक्षे समर्थकांनी विरोधकांवर हल्ले करण्यास सुरुवात केली. राजधानी कोलंबोत ठिकठिकाणी जाळपोळ सुरू झाली. विरोधकांनी काढलेल्या मोर्चांना लक्ष्य करण्यात आले. या सर्व गदारोळात १७४ जण जखमी झाले. आंदोलकांनी खासदारांची राजधानीतील घरेही जाळली.     (वृत्तसंस्था)

आंदोलक आक्रमकसत्ताधारी श्रीलंका पोदुजना पेरामुना पक्षाचे खासदार अमरकीर्ती अतुकोराला यांच्या गाडीला आंदोलकांनी लक्ष्य केले. त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला असता अतुकोराला यांच्या सुरक्षारक्षकाने आंदोलकांवर गोळ्या झाडल्या. त्यानंतर अतुकोराला यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. अतुकोराला यांनी जवळच्या इमारतीत आश्रय घेतला. जमावाच्या हाती सापडण्यापूर्वीच अतुकोराला यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. 

देशभरात संचारबंदीमहिंदा राजपक्षे यांच्या राजीनाम्यानंतर सरकार   समर्थक आणि विरोधक यांच्यात हिंसक घटना घडत असून, देशभरात दंगली भडकल्या आहेत. ठिकठिकाणी जाळपोळीच्या घटना घडत आहेत. अध्यक्ष गोटाबाया यांनी राजधानीसह देशभरात लष्करी तुकड्या तैनात करण्याचे आदेश दिले असून, सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 

टॅग्स :Sri Lankaश्रीलंका