शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

Sri Lanka Crisis: एक मोठी चूक अन् श्रीलंका आर्थिक कोंडीत सापडला; चीनवर अवलंबून राहणं पडलं महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2022 23:30 IST

श्रीलंकेच्या सध्याच्या परिस्थितीला त्याची चुकीची धोरण जबाबदार आहे.

नवी दिल्ली- आर्थिक संकट आणि जनक्षोभाचा सामना करणार्‍या श्रीलंकेची परिस्थिती बिकट होत चालली आहे. प्रचंड महागाई आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत झालेली वाढ यामुळे लोक रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध करत आहेत. जनतेचा रोष इतका वाढला आहे की, त्यांनी राष्ट्रपती भवनावर ताबा मिळवला आणि पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थानाला आग लावली. 

श्रीलंकेच्या सध्याच्या परिस्थितीला त्याची चुकीची धोरण जबाबदार आहे. आज निर्माण झालेली खराब आर्थिक स्थितीला जबाबदार श्रीलंका स्वत: आहे. भारतापासून अंतर ठेवत चीनवर अधिक अवलंबून राहणे त्यांना महागात पडलंय. श्रीलंकेने आयएमएफपेक्षा चीनकडून जास्त कर्ज घेतले. त्यामुळे श्रीलंकेवर आजची वेळ आल्याचे सांगण्यात येत आहे.

श्रीलंकेबद्दल आपल्याला सहानुभूती असल्याचे चीनने म्हटले आहे. चीनने म्हटले आहे की, श्रीलंकेतील विविध वांशिक गट आणि विविध क्षेत्रांतील लोकांना चीन विविध माध्यमांचा वापर करून आपत्कालीन गरजा पुरवत आहे. परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत श्रीलंकेला मदत करत राहील, असे चीनने म्हटले आहे.

दरम्यान, आर्थिक अडचणीत सापडलेल्या श्रीलंकेला भारताने आश्वासन दिले आहे. आम्ही यापूर्वीही पाठिंबा दिला होता आणि आजही आम्ही श्रीलंकेच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असे भारताने म्हटले आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, आम्ही सर्व शक्य मार्गांनी मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि नेहमीच मदत केली आहे. ते त्यांच्या समस्येवर काम करत आहेत, आता पुढे काय होईल ते पाहू, अशी प्रतिक्रिया जयशंकर यांनी दिली.

भारताने इंधनाबाबत मदत केली-

भारताने याआधी श्रीलंकेला डिझेल-पेट्रोल (इंधन)संकटावर मात करण्यासाठी मोठी मदत केली आहे. श्रीलंकेत तेलाच्या तुटवड्यामुळे तेलाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली होती. तेल फक्त अत्यावश्यक कारणांसाठी वापरण्याची परवानगी होती. तेल विक्रीवर बंदी घालण्यात आल्याने श्रीलंकेतील सर्वसामान्य जनतेला पेट्रोलियम पदार्थांच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत भारताने श्रीलंकेला अनेकवेळा मोठ्या प्रमाणात पेट्रोल आणि डिझेल पाठवून मदत केली आहे.

टॅग्स :Sri Lankaश्रीलंकाInternationalआंतरराष्ट्रीय