महिलांना रडण्यासाठी हॉटेलमध्ये विशेष खोली
By Admin | Updated: March 17, 2016 11:58 IST2016-03-17T11:49:34+5:302016-03-17T11:58:06+5:30
प्रत्येक हॉटेलचा आपले एक वैशिष्टय जपण्याचा प्रयत्न असतो. हॉटेलचे चालक ग्राहकाचे लक्ष वेधून घेण्यासाठी वेगवेगळया कुल्पत्या लढवत असतात.

महिलांना रडण्यासाठी हॉटेलमध्ये विशेष खोली
ऑनलाइन लोकमत
टोक्यो, दि. १७ - प्रत्येक हॉटेलचा आपले एक वैशिष्टय जपण्याचा प्रयत्न असतो. हॉटेलचे चालक ग्राहकाचे लक्ष वेधून घेण्यासाठी वेगवेगळया कुल्पत्या लढवत असतात. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण जपानची राजधानी टोक्योमध्ये एका हॉटेलने खास महिलांच्या रडण्यासाठी एक वेगळया खोलीची व्यवस्था केली आहे.
मित्सुई गार्डन योत्सुया असे या हॉटेलचे नाव आहे. रुममध्ये गेल्यानंतर महिलांना रडता यावे यासाठी विशेष प्रकारच्या सुविधा खोलीमध्ये आहेत. अनेकदा रडल्यानंतर काहींना भावना मोकळया केल्यासारख्या वाटतात. महिलांच्या मनावरील तणाव दूर व्हावा म्हणून ही व्यवस्था केल्याचे हॉटेलच्या प्रशासनाचा दावा आहे.
या हॉटेलचे एका रात्रीचे भाडे ५३२९ रुपये आहे. महिलांना अधिक सहजतेने रडता यावे यासाठी खास भावनिक चित्रपटांची व्यवस्था रुममध्ये आहे.