शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
2
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
3
कपिल शर्माला टक्कर द्यायला येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
4
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
5
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
6
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
7
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
8
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
9
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
10
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
11
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
12
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
13
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
14
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
15
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
16
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
17
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
18
IPL Playoffsच्या २ जागांसाठी ५ संघ शर्यतीत; SRH ला ८७.३%, CSK ला ७२.७% टक्के चान्स, तर RCBला...
19
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
20
सूर्यावर भीषण स्फोट; ISROच्या आदित्य L-1 आणि चांद्रयान-2 च्या कॅमेऱ्यात कैद

टिकटॉकवर भीक मागण्याचा 'लाइव्ह' धंदा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 12:16 PM

"प्लीज लाइक, शेअर, प्लीज गिफ्ट' चा टीकटॉकवर बाजार

आज सोशल मीडियाचे अनेक प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत. टिकटोक हा त्यातलाच एक प्लॅटफॉर्म टिकटॉक है माध्यम प्रामुख्याने स्वतःचे व्हिडीओ शेअर करण्यासाठी वापरलं जातं. त्यातही काही लोक त्यावरचे इन्फ्लुएन्सर्स असतात. त्यांना लाखो-करोडो फॉलोअर्स असतात. त्यावर फॅशन, जीवनशैली, प्रवास, रेसिपी, नाच, गाणी असे अनेक व्हिडीओ बघायला मिळतात. पण त्याहीपलीकडे 'टिकटॉकचा उपयोग केला जातो आणि तो उपयोग आहे.

भीक मागण्यासाठी सीरियामधलं युद्ध सुरु झालं त्याला ११ वर्ष होऊ गेली. या अकरा वर्षांमध्ये सीरियातील अनेक कुटुंबांची अक्षरशः वाताहत झाली. अनेकजण देश सोडून स्थलांतरित झाले. पण जे मागे राहिले त्यांना रोजगाराची साधनं फारशी उरली नाहीत कारण या युद्धामुळे सीरियाची अर्थव्यवस्थाच ढासळली. अनेक कुटुंबांवर जगण्यासाठी भीक मागायची पाळी आली, पण सगळ्याच व्यवस्था कोलमडून पडलेल्या या देशात भीक देणार तरी कोण? भीक देण्यासाठी तरी पैसे कोणाकडे आहेत? असा प्रश्न निर्माण झाला. आणि त्यात व्यावसायिक संधी शोधली ती चीनमधल्या टिकटॉक मिडलमन लोकांनी, हे मध्यस्थ इतर लोकांना टिकटोंक कन्टेन्ट तयार करण्यासाठी प्रोत्साहित करतात, त्यासाठी लागणारं मार्गदर्शन देतात, जी मदत लागेल ती करतात आणि त्याबदल्यात त्या टिकटोंक अकाउंटमध्ये जे पैसे येतात त्यातून आपलं कमिशन घेतात.

या मिडलमन लोकांनी सीरियातील शरणार्थी कॅम्पमधल्या काही कुटुंबांना हेरलं आणि त्यांना टिकटॉकवरून पैसे उभे करण्यासाठीचं मार्गदर्शन दिलं. आणि मग ही सीरियन निर्वासित कुटुंब दिवसातले तासचे तास टिकटॉकवर लाइव्ह येऊन भीक मागायला लागली. त्यांच्या घरातलं दारिद्र्य दाखवायचं, मुलांचे कसे हाल होतात ते दाखवायचं, त्यांच्या उपचारांसाठी पैसे मागायचे असं त्या कुटुंबांनी सुरू केलं. हे ज्या कुटुंबांनी सुरू केलं त्यांच्याकडे जगण्यासाठी दुसरा काही मार्गच उरला नव्हता. शिवाय टिकटोंक लाइव्ह जाण्यासाठी देशाबाहेर जाण्याची गरज नव्हती, लोक पैसे देऊ लागले त्यामुळे त्यांना ते फार सोयीचं वाटलं. पण हा सगळा प्रकार कोणालातरी गरज होती, त्यांनी आपलं अकाउंट उघडलं, लोकांकडे मदत मागितली आणि लोकांनी मंदत केली. इतका सरळ सोपा नव्हता. त्यात या मध्यस्थ लोकांनी फार वेगळी गणितं होती.

मध्यस्थ लोकांनी सगळ्यांत पहिल्यांदा काय केले, तर या सीरियन कुटुंबांना ब्रिटिश नंबर्स मिळवून दिले. कारण टिकटोकवर तुम्हाला सामान्यतः तुमच्या आजूबाजूची अकाउंट्स जास्त दाखवली जातात, म्हणजेच सीरियामधील नंबरवर तयार केलेले व्हिडीओ सीरियामध्येच दाखवले गेले असते. त्यातून फार पैसे मिळाले नसते. त्यामानाने हे मध्यस्थ लोक म्हणतात की ब्रिटिश लोक फार जास्त उदार आहेत. ते जास्त पैसे देतात. म्हणून ब्रिटनमधली सीमकार्डस घेण्यात आली.

या सगळ्या प्रकारात हे मध्यस्थ लोक तर त्यांचा हिस्सा घेतातच, पण त्याहून धक्कादायक भाग असा आहे की या व्हिडीओजमधून लोक जे काही पैसे देतात त्यातला मोठा हिस्सा टिकटोंक ही कंपनी स्वतःसाठी ठेवून घेते आणि मोठा म्हणजे किती मोठा? तर ही कंपनी तब्बल ७० टक्के - पैसे स्वतःसाठी ठेऊन घेते, म्हणजे या जगण्यासाठी पैसे मागणान्या लोकांना जर का कोणी ५०० रुपये पाठविले तर टिकटॉकवर रोज लाइव्ह जाणाऱ्या लोकांमध्ये मोना अली अल-करीम आणि च्या सहा मुलींचं कुटुंब आहे. मोनाचा नवरा एका हवाई हल्ल्यात मारला गेला. मोनाची शरीफा नावाची मुलगी दृष्टिहीन आहे. ते सगळे तिच्या शस्त्रक्रियेसाठी पैसे जमवतायत. त्यासाठी ते रोज अनेक तास टिकटॉकवर लाईव्ह येतात आणि त्यांच्या झोपडीच्या जमिनीवर बसून शिकवलेली इंग्लिश वाक्य प्लीज लाइक, प्लीज शेअर, प्लीज गिफ्ट' अशी म्हणत राहतात.

टिकटोंक त्यातून ७० रुपये काढून घेते आणि फक्त ३० रुपये त्या टिकटोंकच्या अकाउंटला पाठविते. त्यानंतर जे पैसे उरतात त्यातले १० टक्के तिथला पैसे काढून देणारा लोकल माणूस काढून घेतो. त्याशिवाय मध्यस्थाला त्यातले ३५ टक्के द्यावे लागतात. असं करता करता त्या गरजू कुटुंबापर्यंत १०० रुपयातले जेमतेम १८-१२ रुपये पोचतात.

याबद्दल माध्यमांनी आरडाओरडा केल्यावर टिकट्रॉकने या प्रकारची दाखल घेतली आहे आणि अशी अकाउंट्स आणि ही पद्धत आम्ही बंद करणार आहोत असेही त्यांनी म्हटले आहे. अशी अकाउंट्स आणि अशी पद्धत बंद केल्याने टिकटॉफची प्रतिमा कदाचित थोडीशी सुधारेल, पण सीरियातल्या त्या निराधार कुटुंबांचे काय होणार हा प्रश्न अनुत्तरितच राहील.

टॅग्स :Tik Tok Appटिक-टॉकSyriaसीरिया