तेहरान - अमेरिका आणि इस्रायलने शनिवारी सकाळी इराणवर एकाचवेळी ३० ठिकाणी हल्ले करून युद्धाला सुरुवात केली आहे. आम्ही इराणला अण्वस्त्रधारी देश बनू देणार नाही अशी धमकी देत डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला थेट इशारा दिला आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या या हल्ल्यानंतर इराणनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. इराणने या हल्ल्याला प्रत्युत्तर देत तब्बल ५ देशांवर हल्ले केले आहे. इराणने इस्रायलवर मिसाइल हल्ले सुरू केलेत. त्याशिवाय इराणने आखाती देशांमधील कुवेत, बहरीन, अबु धाबी, कतार याठिकाणीही हल्ले केले आहे. त्यामुळे आखाती देशांनी आपल्या हवाई हद्द बंद केली आहे.
अमेरिकेकडून झालेल्या हल्ल्यानंतर इराणने बहरीनमधील अमेरिकेच्या तळांवर हल्ला केला आहे. तिथल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी सायरन वाजण्यास सुरुवात झाली आहे. अमेरिकेच्या जुफैर तळावर इराणकडून हल्ला करण्यात आला आहे. अमेरिका इस्रायल यांच्या हल्ल्यानंतर इराणने सौदी अरेबिया, कतार, बहरीन यासारख्या देशातील अमेरिकन तळांना टार्गेट केले आहे. त्यामुळे या हल्ल्यात ५ देशांना ओढण्याचा प्रयत्न इराणने केला आहे. अमेरिकेचा सगळ्यात मोठा लष्करी तळ बहरीनमध्ये आहे. त्याठिकाणी इराणने हल्ला केला आहे.
तेल पुरवठ्यावर होणार परिणाम
सौदी अरेबिया, कुवैत यासारख्या ठिकाणीही इराणने हल्ले चढवल्यामुळे जागतिक बाजारपेठेत तेल पुरवठा साखळी यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. तेल साठ्यावर याचा परिणाम झाल्यानंतर जगात तेल महागण्याचीही शक्यता आहे. अमेरिका इस्रायलने हल्ला केल्यास आम्हीही त्यांना जशास तसे उत्तर देऊ असा पवित्रा इराणने घेतला होता. त्यामुळेच अमेरिका आणि इराण यांच्या संघर्षात या देशांनी भूमिका घेणे टाळले होते. मात्र आता अमेरिका इस्रायल यांच्या हल्ल्यानंतर इराणने जोरदार प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, भारताने या देशातील भारतीय नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नुकतेच भारतीय पंतप्रधान इस्रायल दौऱ्यावर गेले होते. त्यानंतर काही दिवसांत हा हल्ला झाला आहे. त्यामुळे या हल्ल्यात भारताची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. इराणकडून ज्यारितीने हल्ले सुरू झाले ते पाहता जगातील इतर देशांनाही अमेरिका इस्रायलसोबतच्या युद्धात ओढण्याचा इराणचा प्रयत्न आहे. सौदी अरेबिया, कुवैत, बहरीन, कतार या देशांवरही इराणने हल्ले केले आहेत. त्यामुळे येत्या काळात जागतिक पातळीवर मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
Web Summary : Following US-Israeli strikes, Iran attacked five nations, including Israel and Gulf countries. Oil supply disruptions loom, escalating global tensions. India issues advisory.
Web Summary : अमेरिकी-इजरायली हमलों के बाद, ईरान ने इजरायल और खाड़ी देशों सहित पांच देशों पर हमला किया। तेल आपूर्ति बाधित होने की आशंका, वैश्विक तनाव बढ़ा। भारत ने परामर्श जारी किया।