शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

Video - स्पेनमध्ये भीषण अपघात! २ हाय-स्पीड ट्रेनची जोरदार धडक; २१ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 08:16 IST

Spain Train Accident : कोर्डोबा प्रांतात दोन हाय-स्पीड ट्रेनची समोरासमोर धडक होऊन २१ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

स्पेनमध्ये एक भीषण रेल्वे अपघात झाला आहे. कोर्डोबा प्रांतात दोन हाय-स्पीड ट्रेनची समोरासमोर धडक होऊन २१ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. 'एसोसिएटेड प्रेस'ने दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात स्पेनमधील अलिकडच्या वर्षांतील सर्वात भीषण रेल्वे अपघातांपैकी एक मानला जात आहे.

स्पेनची रेल्वे संस्था ADIF च्या माहितीनुसार, हा अपघात कोर्डोबा येथील 'एडामुज' स्टेशनजवळ संध्याकाळी सुमारे ५:४० (GMT) वाजता झाला. प्राथमिक माहितीनुसार, मालागा येथून माद्रिदला जाणारी 'Iryo 6189' ही हाय-स्पीड ट्रेन अचानक रुळावरून घसरली आणि बाजूच्या ट्रॅकवर गेली. त्याच वेळी समोरून माद्रिदहून हुएल्वाकडे जाणाऱ्या ट्रेनची या गाडीशी जोरदार धडक झाली.

या धडकेनंतर दोन्ही ट्रेनचे डबे मोठ्या प्रमाणावर विखुरले गेले. अनेक डबे रुळावरून खाली घसरले, तर काही डबे एकमेकांवर गेले. अपघाताची भीषणता इतकी मोठी होती की, अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी अवजड बचाव यंत्रसामग्रीची मदत घ्यावी लागली. या अपघातानंतर माद्रिद आणि अंडालूसिया दरम्यानची हाय-स्पीड रेल्वे सेवा तात्काळ प्रभावाने थांबवण्यात आली आहे. माद्रिद ते टोलेडो, सियुदाद रिअल आणि पुएर्तोलानो दरम्यान चालणारी व्यावसायिक रेल्वे सेवा सुरळीत सुरू आहे. 

'Iryo' ही एक खासगी हाय-स्पीड रेल्वे ऑपरेटर सेवा असून, तिचे संचालन इटालियन कंपनीद्वारे केले जाते. अंडालूसियाच्या आपत्कालीन सेवांनी सांगितले की, अपघातानंतर लगेचच सर्व रेल्वे वाहतूक रोखून मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. घटनास्थळी अनेक रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि वैद्यकीय पथके रवाना करण्यात आली होती. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, मात्र जखमींची नेमकी संख्या किती याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Spain Train Crash: High-Speed Collision Kills 21, Injures Many

Web Summary : A high-speed train collision in Cordoba, Spain, resulted in 21 deaths and numerous injuries. The Iryo 6189 train derailed near the Edamuz station, colliding with another train. Rescue operations are underway, and the Madrid-Andalusia high-speed rail service is suspended.
टॅग्स :AccidentअपघातTrain Accidentरेल्वे अपघातDeathमृत्यू