शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

स्पेनच्या कॅम्ब्रिल्समध्येही हल्ल्याचा प्रयत्न, पाच दहशतवादी ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2017 09:47 IST

 स्पेनच्या बार्सिलोना शहरातील रॅमब्लास येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर कॅम्ब्रिल्स येथेही व्हॅन गर्दीत घुसवून दहशतवादी हल्ल्याचा दुसरा प्रयत्न झाला.

ठळक मुद्देदुस-या हल्ल्यात सहा नागरीक आणि एक पोलिस अधिकारी जखमी झाला आहे. कॅमब्रिल्स येथे गर्दीत गाडी घुसवणा-या हल्लेखोरांनी अंगाला स्फोटकांनी भरलेला पट्टा बांधला होता.

बार्सिलोना, दि. 18 - स्पेनच्या बार्सिलोना शहरातील रॅमब्लास येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर कॅम्ब्रिल्स येथेही व्हॅन गर्दीत घुसवून दहशतवादी हल्ल्याचा दुसरा प्रयत्न झाला. पण सर्तक असलेल्या पोलिसांनी वेळीच या हल्ल्याचा प्रयत्न उधळून लावला. यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात पाच दहशतवादी ठार झाले. 

दुस-या हल्ल्यात सहा नागरीक आणि एक पोलिस अधिकारी जखमी झाला आहे. व्हॅनमधील पाचव्या हल्लेखोराला जखमी झाल्यानंतर ताब्यात घेण्यात आले होते पण त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असे स्पॅनिश पोलिसांनी सांगितले. कॅमब्रिल्स येथे गर्दीत गाडी घुसवणा-या हल्लेखोरांनी अंगाला स्फोटकांनी भरलेला पट्टा बांधला होता. रॅमब्लास सारखी इथेही हल्लेखोरांनी गर्दीत गाडी घुसवली असे कॅटालान इर्मजन्सी सर्व्हिसेसकडून सांगण्यात आले. 

आणखी वाचा स्पेनमध्ये दहशतवादी हल्ल्यात 13 जणांचा मृत्यू, इसिसनं स्वीकारली जबाबदारीअमरनाथ दहशतवादी हल्ला निंदनीय - अमेरिका

फ्रान्समध्ये दहशतवादी हल्ल्यात ८४ नागरिक ठारस्वीडनमध्ये ट्रकहल्ला, तीन ठार, एक संशयित अटकेत

स्पॅनिश मीडियाने दिलेल्या माहितीनुसार कॅम्ब्रिल्समध्ये हल्लेखोरांची गाडी पलटी झाली. गाडी पलटी झाल्यानंतर हल्लेखोर त्यातून उतरतानच पोलिसांनी त्यांना लक्ष्य केले. त्यात पाच दहशतवादी ठार झाले. कॅम्ब्रिल्स हे किनारपट्टीवर वसलेले शहर असून, बार्सिलोनापासून 120 किलोमीटर अंतरावर आहे. 

दहशतवाद्यांनी  रॅमब्लास येथे पहिला हल्ला केला. त्यांनी गर्दीत गाडी घुसवून अनेकांना चिरडले. त्यानंतर अंदाधुंद गोळीबार केला.  यात 13 जणांचा मृत्यू झाला असून, 100हून अधिक लोक जखमी आहेत. वाहनाच्या धडकेत अनेक जण गंभीररीत्या जखमी झाल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. स्पेन पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली आहे. इसिस या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. 

तर दहशतवादाविरोधात आम्ही स्पेनसोबत असल्याचं विधान इंग्लंडच्या पंतप्रधान टेरेसा मे यांनी केलं आहे. स्पेनमध्ये दुसरा होणारा संभावित हल्ला रोखण्यासाठी कॅम्ब्रिल्समध्ये पोलिसांनी गोळीबार केला. कॅम्ब्रिल्स बंदराजवळ पोलिसांना गोळीबाराचा आवाज आला. त्यानंतर पोलिसांनी लोकांना रस्त्यावर न उतरण्याचा इशारा दिला. स्पेनचे पंतप्रधान मारियानो रखॉय यांनी 'जिहादी हल्ला' असा करार दिला आहे. तत्पूर्वी युरोपिय देशात अनेकदा अशा प्रकारचे दहशतवादी हल्ले झालेत. फ्रान्स, बेल्जियम आणि जर्मनी हे देश अशा हल्ल्यांनी हादरले आहेत. स्पेनच्या राजघराण्यानं या दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. देश अतिरेक्यांच्या दहशतवादापुढे कधीही झुकणार नाही, असं विधान स्पेनच्या राजघराण्यानं केलं आहे.  

टॅग्स :Terrorismदहशतवाद