शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! दक्षिण कोरियातील विमान अपघाताचे कारण काय? ब्लॅक बॉक्समधून रेकॉर्डिंग गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 14:37 IST

दक्षिण कोरियातील विमान अपघाताबाबत मोठा खुलासा झाला आहे.

South Korea Airplane Accident :दक्षिण कोरियामध्ये 29 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या विमानअपघाताबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या विमान अपघातात 181 पैकी 179 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागाल होता. आता या अपघाताबाबत मोठा खुलासा झाला आहे. दक्षिण कोरियाच्या वाहतूक मंत्रालयाने सांगितले की, अपघाताच्या चार मिनिटे आधी विमानाच्या ब्लॅक बॉक्सने काम करणे बंद केले होते. म्हणजेच, शेवटच्या चार मिनिटांचे रेकॉर्डिंग ब्लॅक बॉक्समधून गायब आहे.

शेवटच्या 4 मिनिटांचे रेकॉर्डिंग गहाळ परिवहन मंत्रालयाने सांगितले की, जेजू एअरलाइन्सच्या बोईंग 737-800 विमानात बसवलेले कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर (CVR) आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) विमान अपघाताच्या चार मिनिटे आधी काम करणे थांबले होते. म्हणजेच, अपघाताच्या आधी विमानात काय झाले, याची माहिती समोर येऊ शकत नाही. हे उपकरण आपोआप खराब झाले की, कुणी बंद कले? हा तपासाचा विषय आहे. मंत्रालयाने पुढे सांगितले की, विमान अपघाताच्या तपासासाठी सीव्हीआर आणि एफडीआर डेटा महत्त्वाचा आहे, परंतु अपघाताचा तपास विविध डेटाच्या तपासणी आणि विश्लेषणाद्वारे केला जातो, त्यामुळे आम्ही अपघाताचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहोत.

अपघाताच्या तपासाला काही महिने लागू शकतातदक्षिण कोरियाच्या वाहतूक मंत्रालयाने पुढे सांगितले की, कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरचे प्रथम स्थानिक पातळीवर विश्लेषण करण्यात आले आणि नंतर ते अमेरिकेला उलट तपासणीसाठी पाठवले गेले. फ्लाइट डेटा रेकॉर्डर पूर्णपणे खराब झाले असून, त्याचा कनेक्टरदेखील गायब होता. एफडीआर विश्लेषणासाठी अमेरिकेलाही पाठवण्यात आले आहे. अमेरिकेचे नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड याचे विश्लेषण करेल. विमान अपघाताचे कारण काय होते, हे अद्याप समजू शकलेले नाही, असे मंत्रालयाने म्हटले आहे. त्याच्या तपासाला काही महिने लागू शकतात.

विमानाला अपघात कसा झाला?जेजू एअरलाइन्सचे हे विमान 181 लोकांसह बँकॉकहून दक्षिण कोरियाला येत होते. मुआन विमानतळावर उतरल्यानंतर विमानाने धावपट्टीवर काही सेकंदांचे अंतर कापले आणि त्यानंतर ते धावपट्टीवरुन घसरुन विमानतळाच्या सीमा भिंतीला धडकले. यानंतर विमानात भीषण आग लागली. या घटनेत 179 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. 

टॅग्स :South Koreaदक्षिण कोरियाairplaneविमानAccidentअपघात