शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण आफ्रिकेतील रस्ते सर्वात धोकादायक; भारतही या यादीत सामील, अहवालातून माहिती आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 15:36 IST

Most Dangerous Roads for Drivers : दक्षिण आफ्रिकेत जगातील सर्वात धोकादायक रस्ते असल्याचं अभ्यासातून आलं समोर. पाहा भारत कोणत्या स्थानावर

ठळक मुद्देअहवालातून आली माहिती समोरनॉर्व चालकांसाठी सर्वात सुरक्षित असल्याचा अहवालातून दावा

जर तुम्ही दक्षिण आफ्रिकेतील रस्त्यांवर प्रवास करत असाल तर तुम्ही जगातील सर्वात धोकादायक रस्त्यांवर प्रवास करत आहात. इंटरनॅशनल ड्रायव्हर एज्युकेशन कंपनी Zutobi नं आपल्या एका रिसर्च स्टडीवरून क्रमवारी जाहीर केली आहे. या यादीत ५६ देशांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये भारतातील रस्तेही धोकादायक असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. या क्रमवारीत भारत हा चौथ्या स्थानावर आहे. धोकादायक रस्त्यांच्या यादीत थायलंड दुसऱ्या आणि युनायटेड किंगडम तिसऱ्या स्थानावर आहे. या अहवालानुसार जर तुम्ही नॉर्वेमधील रस्त्यांवर प्रवास करत असाल तर तुम्ही सर्वात सुरक्षित रस्त्यावर प्रवास करत असल्याचं नमूद केलं आहे. सुरक्षित रस्त्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर जपान तर तिसऱ्या स्थानावर स्वीडन हे देश आहेत. Zutobi दिलेल्या माहितीनुसार त्यांनी प्रत्येक देशांमध्ये ५ गोष्टींच्या आधारावर हे विश्लेषण करण्यात आलं आहे. प्रत्येक फॅक्टर्ससाठी १० गुण ठरवण्यात आले होते. त्यानंतर या ५ फॅक्टर्सची सरासरी काढण्यात आली. यामध्ये प्रति लाख लोकसंख्येच्या हिशोबानं रस्ते अपघातात होणारे मृत्यू सामील करण्यात आले आहेत. तसंच किती टक्के लोकं कार चालवताना सीट बेल्टचा वापर करतात. मद्यपान करून किती लोकांचा अपघातात मृत्यू झाला आहे अशा गोष्टींचा विचार अहवालात करण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या ग्लोबल हेल्थ ऑब्झरव्हेटरी आकडेवारीच्या आधारावर हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. दरम्यान, या अहवालाला जस्टिस प्रोजेक्ट साऊथ आफ्रिका नावाच्या एका संघटनेनं आव्हान दिलं आहे. हा एक एनजीओ असून रोड ट्रॅफिकच्या कायद्यात सुधारणेवर काम करत आहेत. दक्षिण आफ्रिकेतील खराब ड्रायव्हिंग स्थितीशी आपण सहमत आहोत. परंतु या अभ्यासाठी Zutobi नं जुनी आकडेवारी घेतल्याची प्रतिक्रिया जस्टिस प्रोजेक्ट साऊथ आफ्रिकाचे चेअरपर्सनं हॉवर्ड डेम्बोवस्की यांनी दिली. तसंच दक्षिण आफ्रिका हाच एकमेव आफ्रिकन देश का आहे, असा सवालही त्यांनी केला. 

टॅग्स :carकारSouth Africaद. आफ्रिकाIndiaभारतEnglandइंग्लंड