शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

जगानं सीरमच्या लशीला स्वीकारले, पण 'या' देशानं नाकारले; १० लाख डोज परत करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2021 08:21 IST

South Africa asks Serum Institute to take back corona vaccine doses: सीरमची लस संपूर्ण जगात वापरली जातेय. जागतिक आरोग्य संघटनेनंदेखील सीरमच्या लसीला हिरवा कंदिल दाखवला आहे. पण दक्षिण आफ्रिका सीरमची लस वापरणार नाही

नवी दिल्ली: संपूर्ण जगावर अद्यापही कोरोना संकटाचं सावट कायम आहे. अनेक देशांत लसीकरणास सुरुवात झाली आहे. मात्र तरीही लसीकरण पूर्ण होण्यास अनेक महिने लागू शकतात. त्यातच कोरोना विषाणूत होणारे बदल आव्हानात्मक ठरत आहेत. या नव्या स्ट्रेनमुळे वैद्यकीय संशोधकांसमोर नवं आव्हान उभं राहत आहे. ब्रिटन पाठोपाठ दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेला कोरोना विषाणूचा नवा प्रकार संशोधकांची चिंता वाढवणारा ठरला आहे. (South Africa asks Serum Institute to take back corona vaccine doses)भारताचा जगात डंका! १०० देशांना कोरोना लस पाठवणार पुण्याची सीरम इन्स्टिट्यूटदक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या विषाणूचा फटका सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं (Serum Institute) तयार केलेल्या कोरोना लसीला बसला आहे. सीरमची ऍस्ट्राझेनेका कोविड लस वापरण्याचा निर्णय दक्षिण आफ्रिकेनं घेतला होता. मात्र आता दक्षिण आफ्रिकेनं आपला निर्णय बदलला आहे. तुम्ही पाठवलेले कोरोना लसीचे १० लाख डोज परत घ्या, अशी सूचना दक्षिण आफ्रिकेनं सीरमला केली आहे. लहान बाळांनाही देता येणार कोरोना प्रतिबंधात्मक लस; ऑक्टोबरपर्यंत विकसित होणार : सीरमसीरमनं फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेत कोरोना लसीचे १० लाख डोज पाठवले होते. मात्र आता दक्षिण आफ्रिकेनं सीरमची लस न वापरण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त द इकॉनॉमिक टाईम्सनं दिलं आहे. लसींच्या उत्पादनांच्या बाबतीत सीरम जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. सीरमनं ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ऍस्ट्राझेनेकाच्या मदतीनं कोरोनावरील लस तयार केली आहे. विशेष म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेनंदेखील सीरमच्या लसीच्या वापरास हिरवा कंदिल दिला आहे.सीरमकडून पुढील काही आठवड्यांत दक्षिण आफ्रिकेला कोरोना लसीच्या ५ लाख डोजचा पुरवठा केला जाणार होता. मात्र आता दक्षिण आफ्रिकेत सीरमच्या लसीचा वापर बराच लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. याबद्दल रॉयटर्सनं सीरमची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण कंपनीनं यावर लगेच भाष्य करणं टाळलं. दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आला आहे. यापासून संरक्षण देण्यात सीरमची लस पूर्णपणे यशस्वी ठरत नाही. या विषाणूवर सीरमची लस वापरली गेल्यास मिळणारं संरक्षण अतिशय कमी असल्याचं दक्षिण आफ्रिकेच्या आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस