इसिसने प्रसिद्ध केली बगदादीची ध्वनिफीत

By Admin | Updated: May 16, 2015 02:17 IST2015-05-16T02:17:00+5:302015-05-16T02:17:00+5:30

इसिस वा इस्लामिक स्टेटस्चा नेता अबू बक्र अल बगदादी हा मारला गेला वा गंभीर जखमी असून कारभार चालवण्यास अक्षम असल्याच्या

The soundtrack of Baghdadi has been released by Isis | इसिसने प्रसिद्ध केली बगदादीची ध्वनिफीत

इसिसने प्रसिद्ध केली बगदादीची ध्वनिफीत

बगदाद : इसिस वा इस्लामिक स्टेटस्चा नेता अबू बक्र अल बगदादी हा मारला गेला वा गंभीर जखमी असून कारभार चालवण्यास अक्षम असल्याच्या बातम्या येत असताना इस्लामिक स्टेटस्ने गुरुवारी एक ध्वनिफीत प्रसिद्ध केली असून, ती अल बगदादीची आहे असा दावा केला आहे.
३४ मिनिटांची ही ध्वनिफीत खरी असेल तर सहा महिन्यांच्या कालावधीत अल बगदादी प्रथमच बोलला आहे. इराकमधील हवाई हल्ल्यात बगदादी गंभीर जखमी झाल्याचे वृत्त होते. पाठीच्या कण्यात बॉम्बमधील खिळे घुसलेले असून या जखमामुळे त्याचा पाठीचा कणा निकामी झाला आहे, असे वृत्त असताना त्याची ध्वनिफीत प्रसिद्ध झाली आहे.

Web Title: The soundtrack of Baghdadi has been released by Isis