चहावाल्याचा मुलगा केवळ भारतातच पंतप्रधान बनू शकतो

By Admin | Updated: August 10, 2014 04:37 IST2014-08-10T04:37:59+5:302014-08-10T04:37:59+5:30

लोकशाही जपणारा भारत हा असा देश आहे की या ठिकाणी चहावाल्याचा मुलगा पंतप्रधान होवू शकतो असे गौरवोद्गगार अमेरिकेचे संरक्षणमंत्री चक हेगल यांनी शनिवारी काढले.

The son of tea can only become the Prime Minister in India | चहावाल्याचा मुलगा केवळ भारतातच पंतप्रधान बनू शकतो

चहावाल्याचा मुलगा केवळ भारतातच पंतप्रधान बनू शकतो

>ऑनलाइन टीम 
नवी दिल्ली, १० - लोकशाही जपणारा भारत हा असा देश आहे की या ठिकाणी चहावाल्याचा मुलगा पंतप्रधान होवू शकतो असे गौरवोद्गगार अमेरिकेचे संरक्षणमंत्री चक हेगल यांनी शनिवारी काढले. अमेरिका आणि भारतासारख्या देशातच हे शक्य होवू शकते असे सांगायलाही ते विसरले नाहीत. 
भारत व अमेरिका वगळता बोटावर मोजण्या इतके देश आहेत की ज्या ठिकाणी एक चहावाल्याचा मुलगा पंतप्रधान होवू शकतो तर केनियाचा मुलगा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होवू शकतो. हेगेल हे ऑब्जर्वर रिसर्च फाउंडेशनच्या कार्यक्रमात  बोलत होते. राजकारण आणि राष्ट्रीय स्वयंसंघांत येण्या आधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये आपल्या वडिलांसोबत चहा विकण्याचे काम केले. तर ओबामा यांचे वडिल केनियाचे मूळ रहिवाशी आणि त्यांची आई अमेरिकन नागरिक होती असे असताना या दोन्ही नेत्यांनी देशाच्या सर्वोच्चपदाला गवसणी घातली आहे. 

Web Title: The son of tea can only become the Prime Minister in India