शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 12:46 IST

donald trump leaves g7 summit in canada amid iran israel war white house more details

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा येथे सुरू असलेली G7 शिखर परिषद अर्ध्यातूनच सोडण्याचा निर्णय घेतला आणि ते अमेरिकेला परतले आहेत. मध्य पूर्वेतील (मिडिल ईस्ट) वाढता तणाव, विशेषतः इराण आणि इस्रायल यांच्यातील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, त्यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

तत्पूर्वी, डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर तेहरानमधील नागरिकांना शहर रिकामे करण्याचा इशारा दिला होता. यावरून अमेरिका या मुद्द्यावर अत्यंत गंभीर असल्याचे स्पष्ट होते. दरम्यान, व्हाईट हाऊसने सोमवारी एक निवेदन जारी करत, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी अमेरिकेत परतले असल्याचे म्हटले आहे. यामुळे, अमेरिका या युद्धात प्रत्यक्षपणे उतरण्याच्या तयारीत तर नाही ना? तसेच, असे कोणते महत्वाचे मुद्दे आहेत, ज्यांसाठी ट्रम्प यांनी जी७ शिखर परिषद अर्ध्यावरच सोडून परतण्याचे ठरवले? असे प्रश्न निर्माण झाले आहेत.

महत्वाचे म्हणजे, डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वीच इस्रायलचे समर्थन केले आहे. मात्र, थेट युद्धात भाग घेण्यासंदर्भात अमेरिकेने अद्याप कसल्याही प्रकारची औपचारिक घोषणा केलेली नाही. यामुळे, ट्रम्प यांचा हा निर्णय गंभीर संकेत देत आहे.

काय म्हणाले, अमेरिकन परराष्ट्रमंत्री? -इराणवर एकट्या इस्रायलने हल्ले केले आहेत. या कारवाईत अमेरिकेचा कुठलाही थेट हात नाही. यावेळी अमेरिकेचे प्राधान्य मध्य पूर्वेत तैनात असलेल्या आपल्या सैनिकांची सुरक्षितता निश्चित करणे आहे, असे अमेरिकन परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी नुकतेच म्हटले होते.इराण कधीही अण्वस्त्रे बाळगू शकत नाही -तत्पूर्वी, जी-7 शिखर परिषदेतील नेत्यांनी एका निवेदनात म्हटले आहे, "इस्रायलला आपले संरक्षण करण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्याच्या सुरक्षिततेसाठी आमचा संपूर्ण पाठिंबा आहे. नागरिकांचे संरक्षणही महत्वाचे आहे. इराण हा प्रादेशिक अस्थिरता आणि दहशतवादाचे एक मुख्य कारण आहे. इराण कधीही अण्वस्त्रे बाळगू शकत नाही, यावर आम्ही ठाम आहोत."

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाIsraelइस्रायलIranइराण