शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

जबरदस्त! युद्धात सैनिकाने गमावले दोन्ही पाय; आता झाला सुपरस्टार, स्टेजवर दाखवतोय कमाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2023 11:55 IST

एका सैनिकाने आपले दोन्ही पाय गमावले, पण आता तो सुपरस्टार झाला आहे. स्टेजवर धमाकेदार परफॉर्मन्स देत आहे.

रशियाशी युद्ध करताना युक्रेनच्या एका सैनिकाने आपले दोन्ही पाय गमावले, पण आता तो सुपरस्टार झाला आहे. स्टेजवर धमाकेदार परफॉर्मन्स देत आहे. तो आता सुपरस्टार बॅले डान्सर बनला आहे. अलेक्झेंडर बुडको असं या सैनिकाचं नाव आहे. वय 27 वर्षे आहे. तो सध्या युनायटेड युक्रेनियन बॅलेट कंपनीसोबत अमेरिकेचा दौरा करत आहे. येथे त्याने 3,000 प्रेक्षकांसमोर त्याच्या कृत्रिम पायांसह डान्स केला आहे.

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, पूर्वी तो ग्राफिक डिझायनर होता आणि त्याने कॉफी शॉपमध्येही काम केलं आहे. गेल्या ऑगस्टमध्ये (2022) उत्तर-पूर्व युक्रेनमधील इझियमजवळ तो रशियन बॉम्बच्या संपर्कात आला होता. मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी तो रशियाच्या व्लादिमीर पुतिन यांच्या सैन्याविरुद्ध लढण्यासाठी तयार झाला होता. 

युद्धात उतरल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांतच ही घटना घडली. तो म्हणतो, 'पोटावर झोपल्यानंतर मला शंखाचा आवाजही ऐकू येत नव्हता. मला फक्त भयंकर वेदना, जीव गुदमरून टाकणारा वास येत होता आणि माझं नाक जमिनीला स्पर्श करत होतं.'

डॉक्टरांना त्याचा एक पाय वाचवण्याची आशा होती, पण तीन दिवसांत त्याचे दोन्ही पाय गुडघ्याखाली कापण्यात आले. आता तो आघातातून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या इतर सैनिकांसाठी आदर्श बनला आहे.

तो म्हणतो, 'ही कोरिओग्राफी युद्धाच्या परिणामांबद्दल, लोकांबद्दल, वेदना आणि नुकसान असूनही आपण किती निर्भय आहोत हे सांगते.' अलेक्झेंडरने पुढील महिन्यात जर्मनीमध्ये होणाऱ्या जखमी सैनिकांसाठी इनव्हिक्टस गेम्समध्ये युक्रेनचे प्रतिनिधित्व करण्यासाठी ट्रायलमध्ये भाग घेतला आहे.

हजारो सैनिकांनी आपले हातपाय गमावले

जेव्हा मी ऐकतो की माझे उदाहरण लोकांना मदत करत आहे, तेव्हा मला समजते की मी सर्वकाही ठीक करत आहे असंही म्हटलं. 18 महिन्यांच्या युद्धानंतर किमान 50,000 युक्रेनियन सैनिकांचा किमान एक अवयव कापण्यात आल्याचं कृत्रिम अवयव बनवणारी जर्मनीची कंपनी ओट्टोबॉकने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी