तर... स्कॉटलंड ब्रिटनपासून स्वतंत्र होण्यासाठी पुन्हा सार्वमत घेणार!
By Admin | Updated: June 24, 2016 17:36 IST2016-06-24T16:44:58+5:302016-06-24T17:36:39+5:30
युरोपीय संघात राहण्याच्या बाजुने असलेल्या स्कॉटलंडला जनतेच्या इच्छेविरोधात ब्रेक्झिटमध्ये सहभागी करून घेता येणार नाही असा इशारा स्कॉटलंडच्या फर्स्ट मिनिस्टर निकोला स्टर्जन यांनी दिला

तर... स्कॉटलंड ब्रिटनपासून स्वतंत्र होण्यासाठी पुन्हा सार्वमत घेणार!
>ऑनलाइन लोकमत
स्कॉटलंड, दि. 24 - युरोपीय संघात राहण्याच्या बाजुने असलेल्या स्कॉटलंडला जनतेच्या इच्छेविरोधात ब्रेक्झिटमध्ये सहभागी करून घेता येणार नाही असा इशारा स्कॉटलंडच्या फर्स्ट मिनिस्टर निकोला स्टर्जन यांनी दिला आहे. ब्रिटनपासून स्वतंत्र होण्यासाठी पुन्हा सार्वमत घेण्याच्या दिशेने आवश्यक तो कायदा अमलात आणण्याचा प्रस्ताव असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे आता ब्रिटन युरोपीय संघातून बाहेर पडताना स्कॉटलंड ब्रिटनपासून विभक्त होण्याचा धोका ब्रिटनपुढे उभा ठाकला आहे. याआधीच्या सार्वमतात निसटत्या मार्जिनने स्कॉटलंडमधल्या जनतेने ब्रिटनमध्ये राहण्यास अनुकूलता दर्शवली होती.
मात्र, ब्रेक्झिटच्या संदर्भात 62 टक्के स्कॉटिश जनतेने युरोपीय संघात राहण्याचा कौल दिला होता याची आठवण स्टर्जन यांनी करून दिली आहे.
जर, ब्रिटन स्कॉटिश जनतेच्या मताविरोधात युरोपीय महासंघातून एक्झिट घेणार असेल, तर स्कॉटलंड ब्रिटनमध्ये राहायचं की नाही यासाठी पुन्हा सार्वमत घेईल अशी गर्भित धमकीच स्टर्जन यांनी दिली आहे.
स्कॉटलंडच्या पहिल्या मंत्री निकोला स्टर्जन यांनी इंग्लंडसारखाच स्काटलंड हा देशही युरोपिय संघातून बाहेर पडू शकतो, असं वक्तव्य केलं आहे. लोकशाही पद्धतीनं मतदान घेतल्यावर नागरिकांनी युरोपिय संघात न राहण्याचा बाजूनं कौल दिल्यास स्कॉटलंड हा देशही युरोपिय संघातून बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र असल्याची माहिती यावेळी निकोला स्टर्जन यांनी दिली. अशी माहिती आरटीई न्यूज या वृत्तसंस्थेनं दिली आहे.
स्कॉटलंडची जनतेनं स्वतःच्या भवितव्याचा स्वतः विचार करून निर्णय घ्यायचा आहे, असा युक्तिवाद निकोला स्टर्जन यांनी मांडल्याचं वृत्त आरटीई या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.