शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून अधिकाधिक मुलांना जन्म दिला पाहिजे, इलॉन मस्क यांनी सांगितलं असं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2024 15:25 IST

Elon Musk News: प्रख्यात उद्योगपती इलॉन मस्क हे नुकतेच बाराव्या अपत्याचे पिता बनले आहेत. मस्क यांच्या असलेल्या १२ मुलांमुळे ते सध्या चर्चेचा विषय ठकले आहेत. मात्र मुलांना जन्म देण्याबाबत इलॉन मस्क यांनी एक अजब कारण सांगितलं आहे.

प्रख्यात उद्योगपती इलॉन मस्क हे नुकतेच बाराव्या अपत्याचे पिता बनले आहेत. मस्क यांच्या असलेल्या १२ मुलांमुळे ते सध्या चर्चेचा विषय ठकले आहेत. मात्र मुलांना जन्म देण्याबाबत इलॉन मस्क यांनी नेहमीच सकारात्मकतेने विचार केला आहे. तसेच अधिकाधिक मुलांना जन्म देण्याची त्यांची इच्छा असल्याचेही मस्क यांनी म्हटले आहे. इलॉन मस्क यांनी त्यांच्या बाराव्या अपत्याचे स्वागत करताना सांगितलं की,  न्यूरालिंकच्या कर्मचारी शिवोन जिलीस हिच्याकडून जन्माला आलेलं नवं बाळ हे काही सिक्रेट नव्हतं. टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क आणि जिलीस यांचं हे तिसरं अपत्य आहे. तत्पूर्वी जिलीस हिने जुळ्या बाळांना जन्म दिला होता. जिलीस न्यूरालिंकमध्ये ऑपरेशन्स आमि स्पेशल प्रोजेक्टची संचालक आहे. इलॉन मस्क यांना पहिली पत्नी जस्टिन हिच्यापासून झालेली पाच मुलं आहेत. तर कॅनेडियन संगितकार ग्राइम्स हिच्यापासून त्यांना तीन मुलं झाली आहेत. दरम्यान, अधिकाधिक मुलांना जन्म देण्याबाबत इलॉन मस्क यांनी खास असं कारण दिलेलं आहे.

इलॉन मस्क यांच्यामते पृथ्वीवर अजूनही खूप कमी लोक आहेत. तसेच ही एक मोठी समस्या आहे. एका कार्यक्रमात मस्क यांनी आपल्या टेस्ला बॉटबाबत बोलताना सांगितले की, केवळ एक बॉटसेनाच कुठलाही आराम भोजन किंवा कुठलीही तक्रार न करता काम करणाऱया कामगारांची व्यावसायिक गरज पूर्ण करू शकते. मात्र जोपर्यंत बॉट सुरू होत नाही तोपर्यंत स्क्विड गेमला अजूनही हाडामासांच्या श्रमिकांची आवश्यकता आहे.  पृथ्वीवर अजूनही पुरेशी माणसं नाही आहेत. कमी जन्मदर हा मानवी संस्कृतीसाठी असलेल्या धोक्यांपैकी एक आहे.

मस्क पुढे म्हणाले की, ज्या लोकांसा आयक्यू चांगला आहे. म्हणजेच जे लोक अधिक बुद्धिमान आहेत. त्यांनी अधिकाधिक मुलांना जन्म दिला पाहिजे. अनेक लोक मुलांना जन्म न देण्याचा निर्णय घेत आहेत. अनेक चांगले आणि स्मार्ट लोक जगातील लोकसंख्या ही प्रमाणाबाहेर वाढल्याचा विचार करत आहेत, असेही मस्क यांनी सांगितले. 

टॅग्स :elon muskएलन रीव्ह मस्कTeslaटेस्लाFamilyपरिवार