शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

सन् न् न्... ऑस्कर विजेत्या अभिनेत्याने स्टेजवरच ॲंकरच्या कानाखाली खेचली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 08:33 IST

विल स्मिथची पत्नी जेदा पिंकेट गेल्या काही वर्षांपासून एका व्याधीने ग्रस्त आहे

लॉस एंजेलिस : जगभरातल्या कोट्यवधी प्रेक्षकांसाठी ऑस्करचा पुरस्कार सोहळा म्हणजे पर्वणी असतो. सोहळ्याचा सूत्रसंचालक कधी शाब्दिक कोट्या करत तर कधी विनोदी कोपरखळ्या मारत सोहळ्याचे वातावरण हलकेफुलके ठेवतो. मात्र, सोमवारी झालेला पुरस्कार सोहळा या सगळ्याला अपवाद ठरला. प्रख्यात अभिनेता विल स्मिथ याने थेट रंगमंचावर जाऊन सूत्रसंचालकाची भूमिका वठवत असलेला विनोदवीर ख्रिस रॉक याच्या श्रीमुखात लगावली अन् जगभरातील कोट्यवधी प्रेक्षक अवाक् झाले. पत्नीविषयी आक्षेपार्ह विधान केल्याने संतापाच्या भरात विलने ही कृती केली. 

विल स्मिथची पत्नी जेदा पिंकेट गेल्या काही वर्षांपासून एका व्याधीने ग्रस्त आहे. या व्याधीत तिचे डोक्यावरील केस गळत असल्याने तिने पूर्णत: टक्कल केले आहे. हाच धागा पकडून ख्रिस रॉक याने बोलण्याच्या ओघात जेदा पिंकेटवर टिप्पणी करत ९०च्या दशकात गाजलेल्या ‘जीआय जेन’ चित्रपटातील नायिकेच्या भूमिकेचा उल्लेख केला.

n ‘जीआय जेन२’ हा चित्रपट आला तर त्याची नायिका जेदा हीच असेल, असे ख्रिस म्हणाला. n पत्नीविषयी आक्षेपार्ह विधान केल्यामुळे संतापलेल्या विलने थेट रंगमंचावर धाव घेत ख्रिस रॉकच्या कानशिलात लगावली. n हा प्रकार एवढा झटपट घडला की उपस्थित प्रेक्षकही स्मिथच्या या कृतीने अवाक् झाले. जागेवर परतल्यानंतरही स्मिथने अर्वाच्य भाषेत ख्रिस रॉकला समज दिली.

‘किंग रिचर्ड’ या चित्रपटातील भूमिकेबद्दल ऑस्कर मिळाल्यानंतर भावूक झालेल्या विल स्मिथने आपल्या हातून घडलेल्या प्रमादाबद्दल माफी मागितली. ख्रिस रॉकनेही आपण पुन्हा असे बोलणार नाही, असे सांगत स्मिथची माफी मागितली.  

    ऑस्कर गोज टू...n सर्वोत्कृष्ट चित्रपट : कोडाn सर्वोत्कृष्ट फिल्म एडिटिंग, सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्कोर, सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइन, सर्वोत्कृष्ट साऊंड, सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट, सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी : ड्यूनn सर्वोत्कृष्ट अभिनेता : विल स्मिथ (चित्रपट : किंग रिचर्ड)n सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : जेसिका चेस्टेन (चित्रपट : दि आईज ऑफ टॅमी फाये)n सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : जेन कॅम्पियन (चित्रपट : दि पॉवर ऑफ दि डॉग) 

अकादमीला लता मंगेशकर, दिलीपकुमार यांचे विस्मरणदिवंगत गानसम्राज्ञी लता मंगेशकर व दिवंगत अभिनेते दिलीपकुमार यांची नावे ऑस्कर चित्रपट सोहळ्यातील ‘इन मेमोरियम’ या विभागात समाविष्ट न केल्याने भारतीय रसिकांची निराशा झाली.

टॅग्स :Oscarऑस्करHollywoodहॉलिवूड