इलाहाबाद-अजमेर-विशाखापट्टणम बनणार स्मार्ट सिटी
By Admin | Updated: September 30, 2014 23:06 IST2014-09-30T23:06:27+5:302014-09-30T23:06:27+5:30
भारतातील इलाहाबाद, अजमेर, विशाखापट्टणम या तीन शहरांना स्मार्ट सिटी बनविण्यासाठी अमेरिका मदत करणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

इलाहाबाद-अजमेर-विशाखापट्टणम बनणार स्मार्ट सिटी
>ऑनलाइन लोकमत
वॉशिग्टंन, दि. ३० - भारतातील इलाहाबाद, अजमेर, विशाखापट्टणम या तीन शहरांना स्मार्ट सिटी बनविण्यासाठी अमेरिका मदत करणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. भारत-अमेरिका या दोन देशांत अनेक महत्वाच्या विषयावर शिखर परिषदेमध्ये चर्चा झाली असून अनेक महत्वाचे करार करण्यात येणार आहेत.
उर्जा, रक्षा, सुरक्षा या विषयात दोन्ही देशात करार करण्यात आले असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. मार्श मिशननंतर बराक ओबामा आणि मी पहिल्यांदाच भेटतो आहे असे सांगून मोदी म्हणाले की, भारतात उद्योग करणे आता सोईचे झाले आहे. अमेरिकातील इबोला या रोगाचा नायनाट करण्यासाठी भारत अमेरिकेला मदत करणार आहे. राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांच्या परिवाराला भारतात येण्याचे निमंत्रण आपण दिल्याची माहिती मोदी यांनी शिखर परिषदेनंतर बोलताना दिली.