अमेरिकेत मिशिगनमध्ये गोळीबार, सहा ठार

By Admin | Updated: February 21, 2016 12:34 IST2016-02-21T12:19:09+5:302016-02-21T12:34:03+5:30

अमेरिकेतील मिशिगन शहरात एका अज्ञात हल्लेखोराने शनिवारी रात्री अंदाधुंद गोळीबार केला. यात सहाजण ठार झाल्याचे वृत्त आहे.

Six fatalities in Michigan in Michigan, six killed | अमेरिकेत मिशिगनमध्ये गोळीबार, सहा ठार

अमेरिकेत मिशिगनमध्ये गोळीबार, सहा ठार

ऑनलाइन लोकमत

मिशिगन, दि. २१ - अमेरिकेतील मिशिगन शहरात एका अज्ञात हल्लेखोराने शनिवारी रात्री अंदाधुंद गोळीबार केला. यात सहाजण ठार झाल्याचे वृत्त आहे. 
एनबीसी न्यूजने शेरीफ कार्यालयाच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार कलामाझू काऊंटीमध्ये ही गोळीबाराची घटना घडली. यामध्ये सहाजण ठार झाले आणि तीन जण जखमी झाले. क्रॅकर बारेल रेस्टॉरंटजवळ हल्लेखोराने गोळीबार केला. हल्लेखोर एसयूव्ही गाडीतून आला होता असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. 
हल्लेखोर पन्नाशीच्या आसपासचा असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. यापूर्वीही अमेरिकेत माथेफिरुंनी केलेल्या गोळीबारात लहान मुलांसह अनेक निष्पाप नागरीकांना प्राणास मुकावे लागले आहे. 

Web Title: Six fatalities in Michigan in Michigan, six killed