पठाणकोट दहशतवादी हल्यातील संशयितांना पाकिस्तानमध्ये ६ दिवसांची पोलीस कोठडी
By Admin | Updated: February 28, 2016 20:55 IST2016-02-28T20:55:55+5:302016-02-28T20:55:55+5:30
पठाणकोट दहशतवादी हल्ला प्रकरणी पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आलेल्या ३ संशयितांना न्यायालयाने ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे

पठाणकोट दहशतवादी हल्यातील संशयितांना पाकिस्तानमध्ये ६ दिवसांची पोलीस कोठडी
>ऑनलाइन लोकमत -
लाहोर, दि. २८ - पठाणकोट दहशतवादी हल्ला प्रकरणी पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आलेल्या ३ संशयितांना न्यायालयाने ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. शनिवारी दहशतवाद विरोधी न्यायालयात हजर केलं असता त्यांना ६ दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आलं आहे.
पठाणकोट हल्ला प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आल्यानंतर पाकिस्तानने ३ संशयितांना अटक केली होती. खालीद मोहम्मद, मोहम्मद शोएब आणि इरशाद उल हक यांना चांद दा किला परिसरातून पोलिसांनी अटक केली होती. पठाणकोट दहशतवादी हल्यात त्यांचा सहभाग असल्याची पोलिसांना शंका आहे. आरोपींनी आपल्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळले असून सहभाग नसल्याचं सांगितल आहे. पोलिसांनी पुढील तपासासाठी त्यांना अज्ञात स्थळी नेलं आहे.