याजिदी नागरिकांचे संकट कायम

By Admin | Updated: August 15, 2014 00:15 IST2014-08-14T23:27:57+5:302014-08-15T00:15:40+5:30

इस्लामिक राज्यासाठी संघर्ष करीत असलेल्या अतिरेक्यांनी सिंजर पर्वतावर घेरलेल्यांना तेथून बाहेर काढले जाण्याची शक्यता खूप कमी आहे

The situation of the Jujidi citizens continued | याजिदी नागरिकांचे संकट कायम

याजिदी नागरिकांचे संकट कायम

वॉशिंग्टन : इस्लामिक राज्यासाठी संघर्ष करीत असलेल्या अतिरेक्यांनी सिंजर पर्वतावर घेरलेल्यांना तेथून बाहेर काढले जाण्याची शक्यता खूप कमी आहे, असे अमेरिकेने म्हटले आहे. या पर्वतावर याजिदी अल्पसंख्याकांची संख्या जेवढी अपेक्षित होती त्यापेक्षा खूपच कमी आहे, असे पेंटॅगॉनने सांगितले. सिंजर पर्वतावर किती लोक अडकलेले असतील याचा व अमेरिकन सैन्याच्या कार्याच्या प्रभावाचा अंदाज घेण्यात आल्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला. (वृत्तसंस्था)
 

Web Title: The situation of the Jujidi citizens continued