शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मार्क झुकरबर्ग यांच्या बहिणीसोबत विमानात छेडछाड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2017 10:55 IST

सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या फेसबुक या संकेतस्थळाचा जनक मार्क झुकरबर्ग यांची बहीण रँडी झुकरबर्गनं लॉस एन्जेलिस येथे मेक्सिको फ्लाइटमध्ये त्यांच्यासोबत छेडछाड झाल्याचा दावा केला आहे.

वॉशिंग्टन  - सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या फेसबुक या संकेतस्थळाचा जनक मार्क झुकरबर्ग यांची बहीण रँडी झुकरबर्गनं लॉस एन्जेलिस येथे मेक्सिको फ्लाइटमध्ये त्यांच्यासोबत छेडछाड झाल्याचा दावा केला आहे.  बुधवारी सोशल मीडियावर त्यांनी या गैरवर्तनासंदर्भातील माहिती पोस्ट केलं होतं. दरम्यान, ''प्रवाशाकडून रँडी झुकरबर्ग यांची छेडछाड होत असताना, संबंधित विमानातील अटेंडेन्टनं ही घटना रोखली नाही,असा दावा करण्यात आला आहे. यासंबंधी चौकशी सुरू असल्याचे स्पष्टीकरण अलास्का एअरलाईन्सनं दिले आहे. 

अलास्का एअरलाईनच्या एक्झिक्युटिव्हला लिहिण्यात आलेल्या पत्रात रँडीनं असे म्हटले आहे की, ''शेजारी बसलेल्या व्यक्तीमुळे अत्यंत गैरसोय होत होती. कारण संबंधित व्यक्ती फर्स्ट क्लासमधील अन्य प्रवाशांवरही अश्लिल शेरेबाजी व अत्यंत खालच्या स्तरातील भाषेत टिप्पणी करत होता. संबंधित व्यक्ती हस्तमैथुनसंदर्भात आणि माझ्या सहकर्मचा-यांबाबतही आक्षेपार्ह विधानं करत होता. शिवाय विमानात येणा-या महिला प्रवाशांबाबतही अश्लिल टिप्पणी करत होता''.  

रँडी यांनी पुढे सांगितले की, ''संबंधित व्यक्तीची फ्लाइट अटेंडेन्टकडेही तक्रार करण्यात आली. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले. शिवाय, एअरलाइन्स कर्मचा-यांकडून या घटनेला खासगी पातळीवर न घेण्याचा सल्ला देत त्यांची जागा बदलली गेली. यावर रँडी यांनी खेद व्यक्त केला. 

''माझी छेडछाड केली जात असतानाही, मी माझी जागा सोडून दुसरीकडे का म्हणून जावं'', अशी नाराजीही रँडी यांनी पत्रात व्यक्त केली आहे. दरम्यान, यावर चौकशी सुरू असून तपासणीमध्ये संबंधित व्यक्ती दोषी आढळल्यास आरोपीच्या यात्रेसंबंधित विशेषाधिकार रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, असे एअरलाइन्सकडून सांगण्यात आले आहे.  

टॅग्स :MolestationविनयभंगCrimeगुन्हा