शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय नौदलाला चांगी नाविक तळ वापरण्यासाठी सिंगापूरची परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2017 15:08 IST

दक्षिण चीन समुद्रात चीनच्या कारवायांना शह देण्यासाठी सिंगापूरने भारतीय नौदलाला चांगी नाविक तळ वापरासाठी खुला केला आहे. यामुळे भारतीय जहाजांना इंधन भरण्याचीही सोय होणार आहे

ठळक मुद्देसिंगापूरच्या पूर्वेस 2004 साली हा नाविक तळ उभारण्यात आला. चांगी हवाई तळापासून केवळ दीड किमी अंतरावर असणारा हा नाविक तळ चांगी आंतरराष्ट्रीय विमानतळापासून 3.5 किमी अंतरावर आहे.

नवी दिल्ली- दक्षिण चीन समुद्रात चीनच्या कारवायांना शह देण्यासाठी सिंगापूरने भारतीय नौदलाला चांगी नाविक तळ वापरासाठी खुला केला आहे. यामुळे भारतीय जहाजांना इंधन भरण्याचीही सोय होणार आहे. भारत आणि सिंगापूर यांच्यामध्ये आज झालेल्या एका महत्त्वाच्या करारामध्ये सिंगापूरने हा निर्णय जाहीर केला आहे.

मलाक्काच्या सामुद्रधुनीमधून चीन तेल आणि नैसर्गिक वायूची आयात करतो, चीनचे येथिल महत्त्व कमी करण्यासाठी या सामुद्रधुनीमध्ये भारत व सिंगापूरने अधिकाधिक वावर वाढवावा अशी इच्छाही सिंगापूरने व्यक्त केली आहे. भारत आणि सिंगापूर या दोन्ही देशांच्या संरक्षणमंत्र्यांच्या चर्चेच्या दुसऱ्या फेरीनंतर या महत्त्वपूर्ण करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. चीनच्या आग्नेय आशिया आणि दक्षिण चीन समुद्रातील हालचालींना यामुळे शह दिला जाणार आहे. या कराराबात विचारले असता सिंगापूरचे संरक्षणमंत्री ना एंग म्हणाले, "चांगी नाविक तळाचा भारताने अधिकाधिक वापर करावा अशी आमची इच्छा आहे. एकमेकांना वाहतुकीमध्ये सहकार्य. दोन्ही देशांच्या सागरी सीमांमध्ये पहारा तसेच एकमेकांना मदत करणे या करारामुळे शक्य होणार आहे."सिंगापूरच्या पूर्वेस 2004 साली हा नाविक तळ उभारण्यात आला. चांगी हवाई तळापासून केवळ दीड किमी अंतरावर असणारा हा नाविक तळ चांगी आंतरराष्ट्रीय विमानतळापासून 3.5 किमी अंतरावर आहे. या तळाचे क्षेत्रफळ 1.28 चौकिमी असून तो समुद्रात भराव टाकून तयार करण्यात आलेला आहे. सिंगापूरचे पंतप्रधान गोह चोक टोंग यांनी 21 मे 2004 साली या नाविक तळाचे उद्घाटन केले होते.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयIndiaभारतindian navyभारतीय नौदल