शीख, तीन मुस्लिमांना विमानातून बाहेर काढले

By Admin | Updated: January 20, 2016 03:19 IST2016-01-20T03:19:29+5:302016-01-20T03:19:29+5:30

एका शीख व्यक्तीसह तिच्या तीन मित्रांना विमानातून बाहेर काढल्याची घटना येथे घडली. पायलटला शंका आली आणि या चौघांना चक्क विमानातून हुसकावून लावले

The Sikhs took three Muslims out of the plane | शीख, तीन मुस्लिमांना विमानातून बाहेर काढले

शीख, तीन मुस्लिमांना विमानातून बाहेर काढले

न्यूयॉर्क : एका शीख व्यक्तीसह तिच्या तीन मित्रांना विमानातून बाहेर काढल्याची घटना येथे घडली. पायलटला शंका आली आणि या चौघांना चक्क विमानातून हुसकावून लावले. दरम्यान, याप्रकरणी अमेरिकन एअरलाईन्सवर न्यायालयात ९ लाख डॉलरचा दावा करण्यात आला आहे.
अमेरिकन एअरलाईन्सच्या टोरँटो ते न्यूयॉर्क या विमानात मागील महिन्यात ही घटना घडली. या विमानातून शाह आनंद या शीख व्यक्तीसह तिचे मित्र फैमुल अलम (बांगलादेशी) आणि अरब राष्ट्रातील मित्र सोबत प्रवास करणार होते. बांगलादेशी आणि अरब मुस्लिम व्यक्तींची त्यांच्या नावावरून ओळख करण्यात आली. (वृत्तसंस्था)

Web Title: The Sikhs took three Muslims out of the plane