Shraddha Kapoor's visit was conducted by local terrorists who attacked Bangladesh | बांगलादेशमध्ये हल्ला करणाऱ्या स्थानिक दहशतवादयानं घेतली होती श्रद्धा कपूरची भेट

बांगलादेशमध्ये हल्ला करणाऱ्या स्थानिक दहशतवादयानं घेतली होती श्रद्धा कपूरची भेट

ऑनलाइन लोकमत
ढाका : बांगलादेशची राजधानी ढाकामधल्या एका रेस्टॉरंटमध्ये दहशतवादयानी २० परदेशी नागरिकांची अमानुष हत्या केली होती. या प्रकरणी आता नवी माहिती समोर येत आहे. हल्ला करणाऱ्यांमधला एक दहशतवादी असलेला निबारस खान बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरलाही भेटला आहे.  अशी बातमी इंडिया टुडेने दिली आहे. या वृत्तानुसार उच्च शिक्षित आणि श्रीमंत असणारा निबारस काही दिवसापुर्वी श्रद्धा कपूरला भेटला होता.  त्याने त्याच्या फेसबूक प्रोफाईलवर श्रद्धा कपूरबरोबरचा फोटो ठेवत 'श्रद्धा कपूर यू ब्यूटी' अशी कॅप्शनही फोटोला दिली.
 
ढाक्यामध्ये हॉटेलवर हल्ला करणारे दहशतवादी इसिसचे नसून, बांगलादेशातीलच आहेत अशी माहिती आज बांगलादेश सरकारमधील एका वरिष्ठ मंत्र्याने दिली. शुक्रवारी रात्री दहशतवाद्यांनी ढाका येथील डिप्लोमॅटिक क्वॉर्टरच्या उपाहारगृहात हल्ला करुन वीस परदेशी नागरीकांची हत्या केली. मृतांमध्ये एका भारतीय तरुणीचाही समावेश आहे. हे सगळे दहशतवादी उच्च शिक्षित आणि श्रीमंत आहेत, दहशतवादी बनणं हल्ली फॅशन झाल्याचं ते म्हणाले. 
या रेस्टॉरंटमध्ये हल्ला करणाऱ्या तिन्ही दहशतवाद्यांना त्यांच्याबरोबर शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी ओळखलं. एकाचं नाव निबारस इस्लाम आहे. निबारस ढाक्याच्या मोनाश यूनिव्हर्सिटी इन मलेशियामध्ये शिकला आहे. इतर दोन दहशतवादी ढाक्क्याच्या स्कोलास्टिका स्कूलमध्ये शिकलेले आहेत.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Shraddha Kapoor's visit was conducted by local terrorists who attacked Bangladesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.