स्वतःच्याच शाळेत गोळीबार करण्याचा कट, 2 विद्यार्थ्यांना अटक
By Admin | Updated: January 28, 2017 07:29 IST2017-01-28T07:29:17+5:302017-01-28T07:29:17+5:30
एका शाळेतील दोन अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आली आहे. स्वतःच्याच शाळेत गोळीबार करण्याचा कट रचल्याचा त्यांच्यावर आरोप

स्वतःच्याच शाळेत गोळीबार करण्याचा कट, 2 विद्यार्थ्यांना अटक
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 28- अमेरिकेच्या एका शाळेतील दोन अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आली आहे. स्वतःच्याच शाळेत गोळीबार करण्याचा कट रचल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपी विद्यार्थ्यांचं वय 15 वर्षांपेक्षाही कमी आहे. मध्य फ्लोरिडामधून त्यांच्या राहत्या घरातून त्यांना अटक करण्यात आली. हत्येचा कट रचल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एबीसी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या मंगळवारी लेडी लेक शहरातील द व्हिलेज चार्टर मिडल स्कूलमधील काही विद्यार्थ्यांमध्ये 27 जानेवारी रोजी शाळेत मोठ्या प्रमाणात गोळीबार होणार असल्याची चर्चा सुरू असल्याचं पोलिसांना समजलं. 27 जानेवारीला शाळेत येऊ नका गोळीबार होणार आहे असं ते बोलत होते.
याबाबत पोलिसांना आणि शाळा प्रशासनाला माहिती मिळाल्यांनंतर कारवाई करून पोलिसांनी दोघांना त्यांच्या राहत्या घरातून अटक केली. त्यांच्या घरून बंदूकही ताब्यात घेण्यात आल्या आहेत.