पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि इराणवरील लष्करी कारवाईचे पडसाद आता थेट अमेरिकन संसदेत उमटू लागले आहेत. अमेरिकेच्या सिनेट सशस्त्र सेवा समितीच्या सुनावणीदरम्यान एका माजी अमेरिकन सैनिकाने इराणवरील हल्ल्याचा जोरदार विरोध केला. या निषेधादरम्यान झालेल्या झटापटीत एका अमेरिकन खासदाराने माजी सैनिकाचा हात मोडल्याची खळबळजनक घटना घडली असून, याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुनावणी सुरू असताना ब्रायन मैकगिनेस या माजी मरीन सार्जेंटने इराणवरील अमेरिकन लष्करी कारवाईच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. मैकगिनेस यांनी २००० ते २००४ या काळात अमेरिकन मरीन कॉर्प्समध्ये सेवा बजावली आहे. जेव्हा कॅपिटल पोलिसांनी त्यांना सभागृहाबाहेर काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मैकगिनेस यांनी दरवाजाची चौकट घट्ट पकडून ठेवली. यावेळी त्यांना हटवण्यासाठी पोलीस आणि अमेरिकन खासदार टिम शीही यांच्यात झटापट झाली. या झटापटीत मैकगिनेस यांचा हात दरवाजाच्या फ्रेममध्ये अडकला आणि तो मोडला.
"कोणालाही इस्रायलसाठी लढायचे नाही"
बाहेर काढले जात असताना जखमी मैकगिनेस वेदनेने विव्हळत ओरडत होते. "कोणताही अमेरिकन सैनिक इस्रायलसाठी लढायला तयार नाही," असं त्यांनी ओरडून सांगितले. पश्चिम आशियातील संघर्षात अमेरिकेच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे अमेरिकन सैनिकांमध्ये आणि नागरिकांमध्ये असलेली नाराजी त्यांच्या या विधानातून स्पष्टपणे दिसून आली. व्हिडिओमध्ये उपस्थित लोक "त्याचा हात... त्याचा हात... ओ माय गॉड!" असे ओरडताना ऐकू येत आहेत.
खासदार टिम शीही यांची बाजू
या घटनेनंतर खासदार टिम शीही यांनी सोशल मीडियावर आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी आपल्या कृतीचा बचाव करताना म्हटले की, "कॅपिटल पोलीस एका आक्रमक आंदोलकाला हटवण्याचा प्रयत्न करत होते आणि मी केवळ परिस्थिती हाताळण्यासाठी त्यांना मदत करत होतो. हा व्यक्ती संघर्षाच्या इराद्यानेच संसदेत आला होता आणि त्याला तसेच उत्तर मिळाले. आशा आहे की त्याला योग्य मदत मिळेल आणि भविष्यात अशी हिंसा होणार नाही."
अमेरिकन राजकारणात खळबळ
या घटनेमुळे अमेरिकेत इराणविरुद्धचे धोरण आणि युद्धविरोधी भावनांवरून पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले आहे. अमेरिकन संसदेत लोकप्रतिनिधीनेच आंदोलकावर बळाचा वापर केल्याने मानवी हक्क संघटनांनी संताप व्यक्त केला आहे.
Web Summary : A former US Marine protesting potential military action against Iran had his arm broken during a scuffle with a congressman. The incident occurred during a Senate hearing, sparking outrage and reigniting debate over US policy in the Middle East.
Web Summary : ईरान के खिलाफ संभावित सैन्य कार्रवाई का विरोध कर रहे एक पूर्व अमेरिकी मरीन का एक सांसद के साथ हाथापाई में हाथ टूट गया। यह घटना सीनेट की सुनवाई के दौरान हुई, जिससे आक्रोश फैल गया और मध्य पूर्व में अमेरिकी नीति पर बहस फिर से शुरू हो गई।