शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
2
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
4
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
5
"ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
6
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
7
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
8
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
9
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
10
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
11
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
12
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
13
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
14
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
15
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
16
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
17
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
18
कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2026 बदलांचे आणि आत्मशोधाचे वर्ष; संघर्षातून गवसणार यशाचा मार्ग!
19
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
Daily Top 2Weekly Top 5

थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 17:35 IST

यामुळे जागतिक स्तरावर चिनी शस्त्रांस्त्रांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्न निर्माण होताना दिसत आहे...

चिनी शस्त्रास्त्रे काय दर्जाची आहेत, हे पुन्हा एकदा जगासमोर आले आहे. 'ऑपरेशन सिंदूर'नंतर आता थायलंड-कंबोडिया युद्धादरम्यान चिनी रॉकेट सिस्टिमचा फायर वेळीच भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे आणि या अपघातात कंबोडियाच्या १-२ नव्हे तर तब्बल ८ सैनिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

...अन् चिनी रॉकेट सिस्टिमच्या चिंधाड्या उडाल्या -सोशल मीडियावर थायलंड-कंबोडिया युद्धाचा एक व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कंबोडियन सैनिक चीननिर्मित 'मल्टिपल लॉन्च रॉकेट सिस्टम' (MLRS) च्या सहाय्याने थायलंडच्या दिशेने रॉकेट डागताना दिसत आहेत. या यंत्रणेतून एकापाठोपाठ एक असे सहा रॉकेट डागले गेले आणि यानंतर, अचानक या रॉकेट सिस्टिमचाच स्फोट झाला. त्याला भीषण आग लागली आत कंबोडियाचे आठ जवानांचा मृत्यू झाला. खरे तर, चीनने ८० च्या दशकात रशियन 'BM-21 ग्रॅड'ची कॉपी करून 'PHL-81' या नावाने ही सिस्टिम तयार केली होती. खरे तर, कंबोडियाने युद्धाच्या सुरुवातीलाच या रॉकेट सिस्टिमसंदर्भात थायलंडला धमकी दिली होती. मात्र, प्रत्यक्षात युद्धभूमीवर ही सिस्टिम शत्रूवर तुटून पडण्याऐवजी कंबोडियाच्याच सैनिकांसाठी काळ ठरली.

ब्रह्मोससमोर चिनी यंत्रणा अपयशी चिनी बनावटीच्या शस्त्रास्त्रांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. तर 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान पाकिस्तानने वापरलेल्या चिनी एअर डिफेन्स सिस्टमला (HQ-9 आणि LY-80) भारताच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा साधा सुगावाही लागला नव्हता. भारतीय क्षेपणास्त्रांना रोखणे तर दूरच, पण चिनी डिफेन्स सिस्टिम डिटेक्ट देखील करू शकले नाही. यामुळे जागतिक स्तरावर चिनी शस्त्रांस्त्रांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्न निर्माण होताना दिसत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Chinese weapons fail: Rocket system explodes, killing Cambodian soldiers.

Web Summary : Chinese-made rocket system malfunctioned during Thailand-Cambodia conflict, killing eight Cambodian soldiers. The system, a copy of a Russian design, exploded during firing. Previously, Pakistani Chinese air defense systems failed against Indian BrahMos missiles, raising concerns about Chinese weapon reliability.
टॅग्स :chinaचीनThailandथायलंडwarयुद्ध