शहरं
Join us  
Trending Stories
1
बाईक घसरली, रायडरचा मृत्यू, बसला आग... एक नव्हे दोन अपघात; कुर्नूलमध्ये नेमकं काय घडलं?
2
निवडणूक झाली की लगेच निकाल, तिन्हींची एकत्र मतमोजणी अशक्य; ईव्हीएम सांभाळून ठेवणे जिकिरीचे
3
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - २६ ऑक्टोबर २०२५; प्रत्येक कामात यश, अचानक धनलाभ होईल
4
'मॅडम फिट प्रमाणपत्र द्या', पोलिसांचा सर्वत्र दबाव, पाच महिने 'ती' मागत होती न्याय; खासदार व पीएचाही उल्लेख
5
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
6
पुढील आठवडा पुन्हा पावसाचा; कोकण किनारपट्टीसह मराठवाडा, विदर्भाला इशारा
7
'तक्रार केल्याने दिला जास्त त्रास'; महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी पीएसआय बदने, बनकर अटकेत
8
पबमध्ये ओळख, कॉलवरून वाद; तरुणीला नेले फरफटत! बोरिवलीतील पबसमोरील थरारक घटना
9
१० ते १५ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; एसआयआरचा पहिला टप्पा पुढील आठवड्यात सुरू
10
धार्मिक द्वेषाचा अजेंडा राबवण्याचा डाव, सणातही समाजामध्ये द्वेष पसरविण्याचे काम : वर्षा गायकवाड
11
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
12
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
13
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
14
वादग्रस्त प्रतिभा टॉवरच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाचा स्थगितीस नकार, निर्णयाने दिलासा
15
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
16
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
17
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
18
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
19
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
20
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!

धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 18:51 IST

Tea App Hacked: गेल्या काही काळात डेटिंग ॲपच्या माध्यमातून मित्रमैत्रिणी शोधण्याचं प्रमाणा वाढलं आहे. मात्र अशा ॲपचा वापर करणं बऱ्याचदा धोकादायकही ठरू शकतं. अशीच घटना अमेरिकेत घडली आहे.

गेल्या काही काळात डेटिंग ॲपच्या माध्यमातून मित्रमैत्रिणी शोधण्याचं प्रमाणा वाढलं आहे. मात्र अशा ॲपचा वापर करणं बऱ्याचदा धोकादायकही ठरू शकतं. अशीच घटना अमेरिकेत घडली आहे. अमेरिकेतील Tea App हे डेटिंग ॲप हॅक करून त्यावरून महिलांचे हजारो फोटो चोरण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.समोर येत असलेल्या माहितीनुसार  4Chan नावाच्या एका युझर प्लॅटफॉर्मने हे ॲप हॅक केले आहे. Tea App ॲपवर बहबुतांश महिलांनी आपली प्रोफाइल प्रायव्हेट ठेवलेली आहे. त्यांच्याच प्रायव्हसीला सुरुंग लावत हे फोटो हॅक केले गेले आहेत.  सुमारे ७२ हजार युझर आयडी हॅक करण्यात आले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रायव्हेट डेटा धोक्यात सापडला आहे.

या घटनेबाबत टी ॲपच्या प्रवक्त्याने सांगितले की, प्राथमिक तपासामध्ये हॅकर्सनी जुन्या स्टोरेज सिस्टिमला हॅक केल्याचे समोर आले आहे. यामधील काही फोटो हे फेब्रुवारी २०२४ पूर्वी ॲपवर अपलोड करण्यात आले होते. हॅकर्सनी जे फोटो चोरले आहेत त्यामध्ये १३ हजार सेल्फी आणि फोटो आयडींचा समावेश आहे.  हे फोटो युझर्सनीं आपली ओळख सिद्ध करण्यासाठी या ॲपवर अपलोड केलेले होते. याशिवाय टी ॲपवर खुल्या असणाऱ्या पोस्ट, कमेंट्स आणि मेसेजमधून हे फोटो घेण्यात आले असेही त्यांनी सांगितले. 

मात्र या हॅकर्सनां कुठल्याही युझरचा ईमेल ॲड्रेस किंवा फोन नंबर मिळाला नाही. म्हणजेच त्यांची ती माहिती सुरक्षित राहिली आहे. या प्लॅटफॉर्मवर १६ लाखांहून अधिक महिला आहेत. त्या येथे प्रायव्हेट पद्धतीने डेटिंग अनुभव आमि सल्ला शेअर करू शकतात. हे अॅप महिलांना एकमेकांसोबत जोडून घेण्याची आणि एकमेकांना मदत करण्याची संधी देते. या ॲपने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

दरम्यान, टी ॲपवरून चोरण्यात आलेल्या काही आयडींचे फोटो 4Chan  नावाच्या वेबसाईटवर पोस्ट करण्यात आले आहेत. हे ॲप महिलांविरोधी विचार बाळगणाऱ्या व्यक्तींमध्ये प्रसिद्ध आहे. इथून कायम दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केली जाते.  

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमUnited StatesअमेरिकाCrime Newsगुन्हेगारी