ऑनलाइन लोकमत
ओहियो, दि. 12 - अमेरिकेमध्ये बलात्काराची एक वेगळीच घटना समोर आली आहे. या घटनेत महिलेवर नाही तर महिलेने बलात्कार केल्याचा प्रकार घडलाय. ब्रिटनी कार्टर नावाच्या एका महिलेने चाकूचा धाक दाखवून टॅक्सी ड्रायव्हरवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे.
जानेवारी महिन्याच्या अखेरीस घडलेली ही घटना आता उघडकीस आली आहे. ब्रिटनी कार्टर हिने ओहियो येथील एका हॉटेलपासून 28 जानेवारीला एक टॅक्सी बूक केली होती. ट्रिनिटी एक्सप्रेस कॅब सर्विसमधून तिने ही कॅब बूक केली होती. त्यावेळी तिच्यासोबत कोरी जॅक्सन नावाचा एक व्यक्तीही होता. टॅक्सीत बसल्यावर जॅक्सनने ड्रायव्हरला चाकूचा धाक दाखवला तर कार्टरने त्याच्यावर बलात्कार केला. त्यानंतर कार्टर आणि जॅक्सनने ड्रायव्हरच्या खिशातून 32 डॉलर घेऊन पळ काढला.
ड्रायव्हरने पोलिसांत तक्रार केल्यानंतर कार्टरला पोलिसांनी अटक केली आहे. तर कोरी जॅक्सन फरार असून त्याच्याविरोधात वॉरंट जारी करण्यात आला आहे. त्याच्यावर लूटमार आणि बलात्कारामध्ये सहयोग केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
ब्रिटनी कार्टरवर 2016 मध्ये दोन वेळेस ड्रग्स बाळगण्याचे आरोपही झाले होते.