शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीवर झाला हल्ला, हॉटेलबाहेरच्या राड्यात मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2024 13:21 IST

चिंतेची बाब म्हणजे, अमेरिकेत भारतीयाच्या हत्येची ही तब्बल पाचवी घटना आहे

Indian Man Died In US: अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीवर हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला. डोक्याला मार लागल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. व्यक्तीचे वय ४१ वर्षे असून हाणामारीत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. ही घटना मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास (अमेरिकन स्थानिक वेळेनुसार) वॉशिंग्टन डाउनटाउनमधील एका रेस्टॉरंटच्या बाहेर घडली. चिंतेची बाब म्हणजे, अमेरिकेत भारतीयाच्या हत्येची ही तब्बल पाचवी घटना आहे. विवेक चंदर तनेजा असे मृताचे नाव असून तो व्हर्जिनियामध्ये एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होता. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याची माहिती आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवेक तनेजा हा भारतीय वंशाचा व्यक्ती व्हर्जिनियामध्ये राहत होता. २ फेब्रुवारी रोजी ते '2 सिस्टर्स' नावाच्या जपानी रेस्टॉरंटमध्ये होते. “एका संशयिताने त्याला जमिनीवर फेकले आणि त्याचे डोके फुटपाथवर आपटले,” अशी माहिती वॉशिंग्टन पोस्टने पोलिसांच्या अहवालाच्या हवाल्याने दिली.

अमेरिकेत भारतीय वंशाच्या लोकांवर हल्ले होत असताना हे प्रकरण समोर आले आहे. ४१ वर्षीय विवेक तनेजा रात्री २ वाजता रेस्टॉरंटमधून बाहेर पडला होता. रेस्टॉरंटजवळील रस्त्यावर त्याच्यावर हल्ला करण्यात आला. पोलिसांच्या अहवालानुसार, हा हल्ला का झाला? याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. हल्ल्यानंतर विवेक बेशुद्ध अवस्थेत होता. पोलिसांना माहिती मिळाली आणि ते तेथे पोहोचले तेव्हा विवेक रस्त्यावर जखमी अवस्थेत पडला होता. यानंतर त्याना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, विवेक तनेजा यांचा बुधवारी रुग्णालयात मृत्यू झाला. सध्या पोलीस cctvमध्ये कैद झालेल्या संशयिताचा शोध घेत आहेत. त्याची अद्याप ओळख पटलेली नाही.

याआधीच्या घटना

श्रेयस रेड्डी बेनिगर, यूएस पासपोर्ट असलेला १९ वर्षांचा विद्यार्थी गेल्या आठवड्यात मृतावस्थेत आढळून आला होता. याशिवाय या आठवड्याच्या सुरुवातीला पर्ड्यू विद्यापीठात नील आचार्य हा एक विद्यार्थी मृतावस्थेत आढळला होता. यापूर्वी १६ जानेवारीला हरयाणाचा २५ वर्षीय विवेक सैनी जॉर्जियातील लिथोनिया येथे एका व्यक्तीने बेदम मारहाण केली होती. सध्या अमेरिकन पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

टॅग्स :AmericaअमेरिकाIndiaभारतDeathमृत्यू