शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
4
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
5
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
6
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
7
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
8
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
9
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
10
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
11
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
12
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
14
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
15
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
16
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
17
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
18
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
19
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
20
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?

कोरोनानंतर चीनमध्ये 'हंता' व्हायरसने एकाचा मृत्यू; जाणून घ्या, या विषाणूचा धोका अन् सर्व काही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 16:08 IST

CoronaVirus कोरोना व्हायरसचा सर्वाधिक मोठा फटका पहिला चीनलाच बसला होता. या देशात साडे तीन हजार बळी गेले आहेत.

बिजिंग : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून चीनमध्ये कोरानाग्रस्तांची संख्या आटोक्यात आली आहे. या व्हायरसला जन्माला घालणाऱ्या चीनमध्ये लोक सुटकेचा नि:श्वास सोडत नाहीत तोच आता नवीन व्हायरसने डोके वर काढल्याने चीनची झोपच उडाली आहे. 

कोरोना व्हायरसचा सर्वाधिक मोठा फटका पहिला चीनलाच बसला होता. या देशात साडे तीन हजार बळी गेले आहेत. मात्र, नंतर इटलीने चीनला मागे टाकले. असे असले तरीही गेल्या आठवड्यापासून वुहानमध्ये नव्या रुग्णांची संख्या कमी झाली होती. तसेच उपचार घेऊनही हजारो रुग्ण घरी गेले होते. मात्र, आता पुन्हा चीनची डोकेदुखी वाढली आहे. 

कोरोनाने थैमान घातलेल्या युन्नान प्रांतामध्ये एका व्यक्तीचा सोमवारी नव्या व्हायरसमुळे मृत्यू झाला. कोरोना कमी झाल्यामुळे हा व्यक्ती शाडोंग प्रांतातून रोजगारासाठी बसने येत होता. या नव्या व्हायरसचे नाव हंता असून त्यांला या व्हायरसची लागण झाल्याचे उघड झाले. यामुळे त्यांच्यासोबत बसमध्ये प्रवास करत असलेल्या ३२ लोकांचीही तपासणी करण्यात आली आहे. चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने याची माहिती दिल्यानंतर सोशल मीडियावर भूकंप झाला आहे. 

अनेकांनी मोठ्या संख्येने ट्विट करत कोरोना सारखी भीती व्यक्त केली आहे. हा व्हायरस कोरोनासारखाच मोठा झाला तर सर्वनाश होईल. जर चीनच्या लोकांनी जनावरांना खाणे बंद केले नाही तर हे होतच राहणार आहे, असेही काहींनी म्हटले आहे.

 हंता व्हायरस काय आहे? कोरोना व्हायरससारखा हंता व्हायरस घातक नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कारण कोरोनासारखा हा हवेद्वारे पसरत नाही. हा व्हायरस उंदीर, खार यांच्या संपर्कात आल्यास होतो. उंदरांनी घरात आतबाहेर केल्यास हा व्हायरस पसरतो. जर कोणी निरोगी असेल आणि तो जर हंता व्हायरसच्या संपर्कात आला तर त्याला लागण होते, असे सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने म्हटले आहे. हंता व्हायरस जीवघेणा आहे. याची लागण झाल्यास मृत्यूची शक्यता ३८ टक्क्यांनी वाढते. ताप, डोकेदुखी, अंगदुखी, पोटदुखी, उलटी, डायरिया आदी लक्षणे दिसून येतात.

मोदींनी 6 वर्षांत जेवढे 'कमावले', तेवढे महिनाभरात गमावले

विदर्भातील शेतकऱ्यांसाठी शरद पवार आले धावून; पासवानांकडे केली 'ही' विनंती

कोरोनाचा दहावा रुग्ण सापडल्यानंतर कसा वाढला आकडा; हा चार्ट पाहून बसेल धक्का

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीन