शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

#Shocking : भूतासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा लंडनमधील तरुणीचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2017 16:02 IST

आपण राहत असलेल्या घरी एक भूत होते आणि त्याच्यासोबत आपले शारिरीक संबंध आले होते, असा त्या तरुणीचा दावा आहे.

ठळक मुद्देभूतासोबत शारिरीक संबंध प्रस्थापित केल्याचा दावा लंडनमधील एका तरुणीने केला आहे.तिच्या या दाव्यामुळे सगळेच अचंबित झालेत. मात्र ती असं का म्हणतेय हे कुणालाच कळत नाहीय. मात्र ती तिच्या प्रियकराच्या दु:खातून सावरली नसल्याने तिला असे भास होत असल्याचं मित्रांना वाटतंय.

वेल्स : भूतासोबत शारिरीक संबंध प्रस्थापित केल्याचा दावा लंडनमधील एका तरुणीने केला आहे. तिच्या या दाव्यामुळे सगळेच अचंबित झालेत. ती असं का म्हणतेय आणि तिला असा अनुभव कसा आला याबाबतीत तिने नुकताच खुलासा केलाय, जो अत्यंत धक्कादायक आहे. 

द सनने दिलेल्या व़ृत्तानुसार, नॉर्थ लंडनच्या वेल्स शहरातील एबेरीस्टीव्थ इथं सियान जेमसन ही तरुणी राहते. तिने एका भूतासोबत शारिरीक संबंध प्रस्थापित केल्याचा दावा केलाय. तीन वर्षांपूर्वी तिचे तिच्या प्रियकरासोबतचं नातं संपवलं होतं. तिला या दु:खातून बाहेर पडायचं होतं त्यामुळे तिन वेल्स शहरातील या जुन्या घरात राहण्याचा निर्णय घेतला.

या जुन्या घरात अनेक जुन्या पेटिंग्स लटकवलेल्या होत्या. तसेच अनेक जुनी पुस्तकही इथं होती. ती इथं राहायला आल्यानंतर तिला अनेक विचित्र स्वप्न पडू लागली. त्यातील काही स्वप्नात ती आपल्या बॉयफ्रेंडसोबत असायची. मात्र एकदा एक वेगळाच चमत्कार झाला. तिच्या पलंगावर शेजारी एक हॅन्डसम इसम झोपला असल्याचं तिच्या लक्षात आलं. पण तो तिचा बॉयफ्रेंड नव्हता. कोणीतरी वेगळाच इसम होता. सुरुवातीला तिला ते स्वप्न असल्याचं वाटलं. म्हणून ती बेडवरून उठून सरळ चालत गेली. तेव्हा अचानक एका भिंतीला आपटली. त्या भिंतीवर एक पेटिंग होतं. त्या चित्रामध्ये असलेला इसमच तिच्या पलंगावर तिच्या शेजारी झोपला असल्याची तिला खात्री पटली. तेवढ्यात पाठून तिला कोणीतरी स्पर्श केल्याचं जाणवलं. तिने या इसमाचं हे चित्र याआधी अनेकदा पाहिलं होतं. जवळपास १८२० सालच्या काळातला हा फोटो होता. या देखण्या इसमाच्या चित्रावर ती भाळली होती. कालांतराने त्यांच्यात ओळख होत गेली. तेव्हा तिला त्याच्याविषयी अधिक माहिती मिळत गेली. त्याचं नाव रॉबर्ट आहे. जवळपास १०० वर्षांपूर्वी त्याचा मृत्यू झाला होता. 

आणखी वाचा - अरे बापरे! जपानमधल्या या माश्याचं वजन तब्बल २३०० किलो

ती म्हणण्याप्रमाणे, खरंतर सियान भूता-खेतांवर विश्वास ठेवणाऱ्यातली आहे. तिने याआधी अनेक वेळा भूत पाहिलं असल्याचा तिचा दावा आहे. पण रॉबर्ट या भूतासोबत आलेला अनुभव वेगळा होता. हळूहळू ती रॉबर्ट या भूताच्या प्रेमात पडू लागली, असं ती म्हणते. रोज रात्री तो तिथं येऊन सकाळी निघून जात असे. सकाळी निघताना त्याच्या जाण्याचा आवाज सियानच्या कानी पडायचा. त्याला पाहण्यासाठी तीसुद्धा बाहेर यायची, मात्र सकाळचा तो तिला केव्हाच दिसला नाही. असं तिच्याबाबतीत त्यानंतरही घडत गेलं. तिने या इसमाचा शोध इंटरनेटवरही घेण्याचा प्रयत्न केला. १९ व्या शतकात एक फ्रेंच आर्टिस्ट हुबेहूब रॉबर्टसारखा असल्याचं तिला दिसलं. शेवटी तिनं हा सगळा प्रकार तिच्या मित्रांना सांगितला. त्यांनाही या प्रकारावर हसू आवरता आलं नाही. ती तिच्या प्रियकराच्या दु:खातून सावरली नसल्याने तिला असे भास होत असल्याचं मित्रांना वाटत होतं. भूत वगैरे काही नसतं आणि हे सगळे भास-आभासाचे खेळ असल्याचं तिच्या मित्रांनी तिला समजावलं. शेवटी आता सियान एका व्यक्तीसोबत सुखाने नांदत असल्याचंही मित्रांकडून सांगण्यात आलं.

जरा हटके बातम्यांसाठी येथे क्लिक करा.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयLondonलंडन