शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Putin Health Condition: पुतिन यांच्या प्रकृतीबाबत धक्कादायक खुलासा, 'या' गंभीर आजारांचा सामना करतायत रशियाचे राष्ट्रपती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2022 11:09 IST

आजारपणामुळे पुतिन यांना युद्धासंदर्भातही योग्य निर्णय घेण्यास अशक्य होत आहे. पुतीन यांच्या अनुपस्थितीत माजी पंतप्रधान दिमित्री मेदवेदेव आणि संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु हेच बहुतांश निर्णय घेत आहेत.

सध्या संपूर्ण जगात रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धा बरोबरच, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचीही जबरदस्त चर्चा सुरू आहे. या चर्चेची प्रामुख्याने दोन कारणे आहेत, एक म्हणजे, युद्धासंदर्भातील त्यांची आक्रमक वृत्ती आणि दुसरे म्हणजे, त्यांची प्रकृती. माध्यमांतील विविध वृत्तांनुसार, सध्या पुतिन हे विविध आजारांमुळे त्रस्त आहेत. यामुळे, ते अनेक सार्वजनिक कार्यक्रमांपासून स्वत:ला दूर ठेवत आहेत. काही दिवसांपूर्वी व्लादिमीर पुतिन हे त्यांच्या निवासस्थानीच पायऱ्यांवरून खाली पडल्याचाही दावाही काही वृत्तांमुध्ये करण्यात आला होता. 

अनेक आजारांनी ग्रस्त आहेत पुतिन? -रशियातील राजकीय विश्लेषक व्हॅलेरी सोलोव्ही यांच्या मते, रशियाचे राष्ट्रपती एकाच वेळी अनेक आजारांचा सामना करत आहेत. ते कॅन्सर, पार्किन्सन्स डिसीज आणि स्किझोफेक्टिव्ह डिसऑर्डर शिवाय, इतरही काही आजारांनी त्रस्त आहेत. यामुळेच त्यांची प्रकृती झपाट्याने ढासळत चालली आहे. पुतीन यांच्या खराब प्रकृतीचा परिणाम त्यांच्या युक्रेन युद्धासंदर्भातील निर्णयांवरही होत आहे. व्हॅलेरी म्हणाले, की आजारपणामुळे पुतिन यांना युद्धासंदर्भातही योग्य निर्णय घेण्यास अशक्य होत आहे. पुतीन यांच्या अनुपस्थितीत माजी पंतप्रधान दिमित्री मेदवेदेव आणि संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु हेच बहुतांश निर्णय घेत आहेत.

चेहऱ्यावर सूज, हात आणि पायांचीही समस्या -पुतिन यांच्या ताज्या छायाचित्रांच्या आधारे, त्यांच्या चेहऱ्यावर सूज असल्याचा आणि त्यांचे हात पाय थरथरत असल्याचा दावाही काही वृत्तांमध्ये करण्यात आला आहे. एवढेच नाही, तर  या समस्या लपविण्यासाठी पुतिन त्यांच्या सार्वजनिक कार्यक्रमांदरम्यान एखाद्या गोष्टीचा आधार घेताना दिसतात, असा दावाही करण्यात येत आहे. याच बरोबर, एका फुटेजमध्ये पुतिन चर्चमध्ये ओठ चावतानाही दिसत आहेत. यावरून ते असाध्य आजाराने ग्रस्त असण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. मात्र, क्रेमलिनने पुतीन यांच्या प्रकृतीबाबत अद्याप कुठल्याही प्रकारचे अधिकृत माहिती जारी केलेले नाही.

टॅग्स :Vladimir Putinव्लादिमीर पुतिनRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाwarयुद्ध