शॉकिंग - १६ वर्षीय तरुणीवर ३३ नराधमांकडू ३६ तास बलात्कार

By Admin | Updated: May 29, 2016 12:15 IST2016-05-29T12:15:50+5:302016-05-29T12:15:50+5:30

दिल्लीमधील निर्भया बलात्कार प्रकरणाप्रमाणेच ब्राझीलमध्येही एक धक्कादायक घटना घडली आहे. ब्राझीलमध्ये एका १६ वर्षीय तरुणीवर तब्बल ३३ नराधमांनी ३६ तास बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे.

Shocking: 33 year-old girl raped for 16 hours on 16-year-old rape | शॉकिंग - १६ वर्षीय तरुणीवर ३३ नराधमांकडू ३६ तास बलात्कार

शॉकिंग - १६ वर्षीय तरुणीवर ३३ नराधमांकडू ३६ तास बलात्कार

>ऑनलाइन लोकमत
ब्रझील, दि. २९ : दिल्लीमधील निर्भया बलात्कार प्रकरणाप्रमाणेच ब्राझीलमध्येही एक धक्कादायक घटना घडली आहे. ब्राझीलमध्ये एका १६ वर्षीय तरुणीवर तब्बल ३३ नराधमांनी ३६ तास बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे.
बंदुकीच्या धाकाने ३३ जणांनी हे दुष्कृत्य केल्याचं स्थानिक मीडियाने सांगितलं आहे.२० मे च्या रात्री पीडित तरुणी तिच्या प्रियकराच्या घरी गेली. त्यानंतर तिच्या दुर्दैवाला सुरुवात झाल्याचं म्हटलं जातं. त्यानंतर ४ ते ५ दिवसांनी काही जणांनी तिचे आक्षेपार्ह फोटो ट्विटरवर टाकले आणि ही घटना उघड झाली. 
 
या घटनेनंतर पीडित तरुणीला माणसिक धक्का बसला असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु असून तिचं काऊन्सिलिंग केलं जात आहे. रिओ ऑलिंपिक स्पर्धा अवघ्या दोन महिन्यांवर आली असताना त्यापूर्वी ही भयंकर घटना घडली आहे. ही धक्कादायक घटना रिओमध्ये घडली आहे आणि पुढील दोन महिन्यांच्या काळात रिओमध्येच ऑलिम्पिकचं आयोजन होत असल्याने वाढत्या गुन्हेगारीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
 

Web Title: Shocking: 33 year-old girl raped for 16 hours on 16-year-old rape