शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

भारतासाठी धक्का; एच१बी व्हिसा प्रक्रियेत होणार बदल, ट्रम्प सरकारचा नवा तडाखा; आता ग्रीन कार्ड देण्याच्या पद्धतीचेही स्वरूप बदलणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 06:47 IST

India-US Relation: अमेरिकेत नोकरी, व्यवसायासाठी जाऊ इच्छिणाऱ्या तसेच भारतीय कर्मचाऱ्यांकडून मोठी मागणी असलेला एच१बी व्हिसा तसेच ग्रीन कार्ड यांच्या प्रक्रियेत बदल केले जाणार आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारमधील वाणिज्य मंत्री हॉवर्ड लुटनिक यांनी ही घोषणा केली आहे.

न्यूयॉर्क / वॉशिंग्टन - अमेरिकेत नोकरी, व्यवसायासाठी जाऊ इच्छिणाऱ्या तसेच भारतीय कर्मचाऱ्यांकडून मोठी मागणी असलेला एच१बी व्हिसा तसेच ग्रीन कार्ड यांच्या प्रक्रियेत बदल केले जाणार आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारमधील वाणिज्य मंत्री हॉवर्ड लुटनिक यांनी ही घोषणा केली आहे. ल्युटनिक यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, सध्याच्या एच१बी कार्यक्रमाची रचना वाईट असून आम्ही ती बदलणार आहोत. अमेरिकेत कायमस्वरूपी निवासासाठी ग्रीन कार्डच्या पद्धतीतही काही बदल करण्यात येतील. अमेरिकी नागरिक दरवर्षी सरासरी ७५ हजार डॉलर कमावतो तर ग्रीन कार्ड धारक दरवर्षी सरासरी ६६,००० डॉलर कमावतो. म्हणजे आपण तळाच्या गटातील लोकांची निवड या कार्डसाठी करत आहोत. त्यामुळे या प्रक्रियेत बदल व्हावा ही डोनाल्ड ट्रम्प यांची  इच्छा आहे. ग्रीन कार्ड आता गोल्ड कार्डसारखे होणार आहे. (वृत्तसंस्था) 

दरवर्षी ६५,००० एच१बी व्हीसांपैकी आणि अमेरिकेत उच्च शिक्षण घेतलेल्या २०,००० अतिरिक्त अर्जदारांमध्ये भारतीय व्यावसायिकां मोठा वाटा असतो. मात्र, अमेरिकनांना नोकऱ्या प्रदान करण्यासाठी ट्रम्प प्रशासन यात बदल करत आहे. 

'एच१बी व्हिसाचा कंपन्यांकडून गैरवापर'; अमेरिकनांना फटकाफ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डीसँटिस यांनी दावा केला की, एच१बी व्हिसा ही फसवणूक आहे. या प्रणालीचा कंपन्या गैरफायदा घेतात. काही कंपन्या मोठ्या प्रमाणात अमेरिकी कर्मचाऱ्यांना कामावरून काढतात.विदेशी कर्मचाऱ्यांसाठी एच१बी मिळवत आहेत किंवा त्या व्हिसाचे नूतनीकरण करत आहेत. एआयमुळे अमेरिकी युवकांना नोकऱ्या मिळण्यात अडचणी येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.हॉवर्ड लुटनिक याबाबत म्हणाले की, विदेशी कर्मचाऱ्यांना अमेरिकेत नोकऱ्या मिळवून देणारी सध्याची एच१बी व्हिसा प्रणाली ही फसवणूक आहे.

 

टॅग्स :United StatesअमेरिकाIndiaभारत