शिया बंडखोरांकडून ९ वर्षाच्या मुलाची हत्या
By Admin | Updated: March 5, 2015 23:37 IST2015-03-05T23:37:40+5:302015-03-05T23:37:40+5:30
नऊ वर्षांच्या मुलाला शिया बंडखोर अतिशय क्रूरपणे ठार मारतानाचा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे.

शिया बंडखोरांकडून ९ वर्षाच्या मुलाची हत्या
बगदाद : नऊ वर्षांच्या मुलाला शिया बंडखोर अतिशय क्रूरपणे ठार मारतानाचा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. हा मुलगा इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशतवादी संघटनेचा पाठीराखा असल्याचा त्याला ठार मारणाऱ्यांचा आरोप होता. ही घटना इराकमधील टिकरित शहरात चित्रित करण्यात आल्याचे दिसते.
टिकरित शहरात इराकचे लष्करी सैनिक व खासगी शियांच्या जवळपास ३० हजार सैनिकांनी इसिसच्या दहशतवाद्यांना हुसकावून लावण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. असेही असू शकते की दहशतवादी संघटनांनी प्रचाराचा भाग म्हणूनही तो खुला केलेला असू शकतो. असे असले तरीही या व्हिडिओतील क्रौर्य पाहून प्रश्न असा निर्माण होतो की, इसिसविरोधात लढण्यासाठी स्थानिक सशस्त्र गटांना एवढे स्वातंत्र्य कसे? (वृत्तसंस्था)