शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
2
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
3
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
4
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
5
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
6
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
7
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
8
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
9
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
10
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
11
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
12
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
13
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
14
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
15
चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!
16
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
17
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
18
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री
19
५० टक्के ट्रम्प टॅरिफचा वार, भारत कसा करणार बचाव? ७ पर्याय अजून खुले; अमेरिका गुडघे टेकेल!
20
संधी साधायची तर...! या ईलेक्ट्रीक कारवर मिळतोय १० लाखांपर्यंतचा डिस्काऊंट...

कुख्यात अल जवाहिरीला पाकिस्तानमध्ये आश्रय

By admin | Updated: April 23, 2017 01:12 IST

कुख्यात अतिरेकी संघटना अल-कैदाचा प्रमुख आयमन अल्-जवाहिरी याला पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयने कराचीत दडवून ठेवले असल्याचे खळबळजनक

नवी दिल्ली : कुख्यात अतिरेकी संघटना अल-कैदाचा प्रमुख आयमन अल्-जवाहिरी याला पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयने कराचीत दडवून ठेवले असल्याचे खळबळजनक वृत्त अमेरिकी नियतकालिक ‘न्यूज वीक’ने दिले आहे. अल-कैदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याला अमेरिकेने पाकिस्तानातच ठार मारले होते. त्याच्या मृत्यूनंतर अल-कैदाची सूत्रे जवाहिरी याने हाती घेतली होती. न्यूज वीकच्या वृत्तानुसार, २00१ मध्ये अमेरिकी फौजांनी अल-कैदाला अफगाणिस्तातून हाकलले, तेव्हा जवाहिरी पाकिस्तानच्या आश्रयास आला. तेव्हापासून आयएसआय त्याला सांभाळत आहे. ही बाब अमेरिकेलाही माहीत असण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये बराक ओबामा प्रशासनाने जवाहिरी याचा ड्रोन विमानाद्वारे पाठलाग केला होता. तो दडून बसलेली इमारत बॉम्ब टाकून उद्ध्वस्त केली होती. दैव बलवत्तर म्हणून जवाहिरी या हल्ल्यातून वाचला. त्याच्या अंगावर भिंत कोसळली होती. त्याचा चष्मा फुटला होता. सीमावर्ती भागातील तालिबानी संघटना अफगाण सरकारशी शांतता वाटाघाटी करीत आहेत. त्यामुळे अल-कैदाची ब्याद त्यांना नको आहे. या पार्श्वभूमीवर आयएसआयने जवाहिरीला कराचीत हलवले आहे. कराचीत कट्टरपंथी इस्लामला चांगले समर्थन आहे, शिवाय १९ व्या शतकातील चिंचोळ्या रस्त्यांचे हे शहर लपून बसण्यासाठीही आदर्श आहे. (वृत्तसंस्था)डोळे मिटण्यापूर्वी करायचाय अखेरचा हल्ला- आयमन अल-जवाहिरीला डोळे मिटण्यापूर्वी अमेरिकेवर अखेरचा हल्ला करायचा असल्याचे सूत्रांनी ‘न्यूज वीक’ला सांगितले. हा हल्ला प्रचंड मोठा आणि खतरनाक असेल, असे सूत्रांनी सांगितले. - जाणकारांच्या मते, अल-कैदामध्ये अजूनही अमेरिकेवर हल्ला करण्याची क्षमता आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनालाही याची जाणीव आहे.लादेनचा मुलगाही पाकिस्तानातचएका अधिकाऱ्याने ‘न्यूज वीक’ला सांगितले की, ओसामा बिन लादेनचा २६ वर्षीय मुलगा हमजा बिन लादेनलाही आयएसआयने पाकिस्तानमध्ये दडवून ठेवले आहे. दहशतवादाचा उदयोन्मुख तारा म्हणून हमजाकडे पाहिले जाते