मृत्यू झालेल्या बॉयफ्रेंडकडून तिला हवंय अपत्य

By Admin | Updated: May 9, 2017 00:49 IST2017-05-09T00:49:08+5:302017-05-09T00:49:08+5:30

मृत्यू झालेल्या व्यक्तीकडून कोणी काही अपेक्षा केली तर ती पूर्ण होऊ शकते काय? अर्थात, असा प्रश्नच उपस्थित होऊ शकत नाही;

She wants her offspring from death boyfriend | मृत्यू झालेल्या बॉयफ्रेंडकडून तिला हवंय अपत्य

मृत्यू झालेल्या बॉयफ्रेंडकडून तिला हवंय अपत्य

सिडनी : मृत्यू झालेल्या व्यक्तीकडून कोणी काही अपेक्षा केली तर ती पूर्ण होऊ शकते काय? अर्थात, असा प्रश्नच उपस्थित होऊ शकत नाही; पण आॅस्ट्रेलियातील एका तरुणीने आपल्या बॉयफे्रंडकडून अशीच काहीशी अपेक्षा ठेवली आहे. तिला या बॉयफें्र डच्या मुलाची आई व्हायचे आहे. आता ते कसे शक्य आहे? त्याचे झाले असे की, आॅस्ट्रेलियातील २४ वर्षीय आयला क्रेस्वेल या तरुणीचे जोशुआ डेव्हिस याच्यासोबत प्रेम होते. दुर्दैवाने जोशुआ याचा मृत्यू झाला. आता आयल क्रेस्वेल हिने न्यायालयात एक याचिका दाखल करीत या बॉयफें्रडच्या मुलाची आई होण्यासाठी परवानगी मागितली आहे. तिने न्यायालयाला सांगितले की, आम्ही दोघे लवकरच लग्न करणार होतो; मात्र त्याचा मृत्यू झाला. तिने स्पर्म बँकेत या बॉयफें्रडचे स्पर्म स्टोअर करून ठेवले आहेत. आता आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तिला अपत्य हवे आहे. तिच्या या निर्णयाला डेव्हिसच्या नातेवाइकांनीही पाठिंबा दर्शविला आहे.

Web Title: She wants her offspring from death boyfriend