..म्हणो तिने मंगळावर दोन माणसं पाहिली!
By Admin | Updated: November 28, 2014 01:43 IST2014-11-28T01:43:25+5:302014-11-28T01:43:25+5:30
35 वर्षापूवीमंगळ ग्रहावर चालणारी दोन माणसं आपण पाहिली होती, असा दावा अमेरिकेतील एका महिलेने एका रेडिओ स्टेशनला फोन करून केला आहे.

..म्हणो तिने मंगळावर दोन माणसं पाहिली!
न्यूयॉर्क : 35 वर्षापूवीमंगळ ग्रहावर चालणारी दोन माणसं आपण पाहिली होती, असा दावा अमेरिकेतील एका महिलेने एका रेडिओ स्टेशनला फोन करून केला आहे. स्वत:ला अमेरिकेच्या ‘नासा’ अंतराळ संशोधन संस्थेची माजी कर्मचारी म्हणविणा:या व स्वत:चे ‘ज्ॉकी’ एवढेच नाव सांगणा:या या महिलेने कोस्ट टू कोस्ट एएम रेडिओ स्टेशनला करून हा दावा केल्याचे वृत्त ‘इंटरनॅशनल बिङिानेस टाइम्स’ या वृत्तपत्रने दिले आहे. ‘नासा’ने मात्र या महिलेच्या दाव्याची अद्याप शहानिशा केलेली नाही.
अमेरिकेचे ‘व्हायकिंग एक्स्पोलर’ हे अंतराळयान 1979 मध्ये मंगळ ग्रहावर उतरले तेव्हा आपण ‘नासा’मध्ये नोकरी करीत होतो, असे या महिलेचे म्हणणो आहे.
रेडिओ स्टेशनच्या फोऩ-इन कार्यक्रमात फोन करून या महिलेने सांगितले की, त्यावेळी मी व आणखी सहा सहकारी ‘व्हायकिंग’ यानाकडून पाठविले जाणारे संदेश ग्रहण करणा:या ‘डाऊनलिंक टेलेमेट्री’ विभागात काम करीत होतो. ‘व्हायकिंग’ यान मंगळावर फेरफटका मारत असतानाची तेथून पाठविलेली चलतचित्रे पाहत असताना मला दोन माणसं क्षितिजरेषेपासून अवतीर्ण होऊन ‘व्हायकिंग’च्या दिशेने येताना दिसली. त्या दोन माणसांनी ‘स्पेससूट’ परिधान केलेला होता. पण त्यांचा ‘स्पेससूट’ आपले अंतराळवीर घालतात तसा जाडजूड नव्हता. तो केवळ संरक्षणात्मक पोशाख होता. आम्ही फक्त आमची उपकरणो ठाकठीक करीत होतो. नंतर (मंगळावर दिसलेल्या) त्या माणसांनी आमची ‘व्हिडिओ लिंक’ कापून टाकली, असेही त्या महिलेने सांगितले. (वृत्तसंस्था)
35 वर्षापूर्वीची घटना
मंगळ ग्रहाची छायाचित्रे पृथ्वीवर पाठविणारे ‘व्हायकिंग एक्स्प्लोलर’ हे हे पहिले अंतराळयान होते. ‘व्हायकिंग-1’ 2क् ऑगस्ट 1975 रोजी सोडले गेले व 9 सप्टेंबर 1975 रोजी ‘व्हायकिंग-2’ अंतराळात गेले.