लग्नाचा प्रस्ताव त्याने ठेवला थेट विमानात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2017 00:46 IST2017-05-12T00:46:45+5:302017-05-12T00:46:45+5:30
आपल्या आयुष्याचा जोडीदार होऊ पाहणाऱ्याने आपल्याला वेगळ्या पद्धतीने लग्नाचे (प्रपोज करावे) विचारावे, अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते. लोक मग वेगवेगळ्या कल्पनांचा विचार करतात.

लग्नाचा प्रस्ताव त्याने ठेवला थेट विमानात
आपल्या आयुष्याचा जोडीदार होऊ पाहणाऱ्याने आपल्याला वेगळ्या पद्धतीने लग्नाचे (प्रपोज करावे) विचारावे, अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते. लोक मग वेगवेगळ्या कल्पनांचा विचार करतात.
अशीच एक कल्पना सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यात पायलटने त्याच्या हवाई सुंदरी असलेल्या प्रेयसीला विमानात प्रपोज केले. त्यांचे स्वागत मग प्रवाशांनी केले. तो बऱ्याच दिवसांपासून तिच्या प्रेमात पडला होता.
मग तो एका संधीच्या शोधात होता. ती साधून तो तिला आश्चर्याचा धक्का देणार होता. मग हवेत असलेल्या विमानापेक्षा आणखी कोणती जागा सुंदर असेल? विमानात असलेल्या एका प्रवाशाने आपल्या मोबाईलमध्ये हे सुंदर दृश्य टिपले व अनेक सोशल मीडियावर ते व्हायरल झाले.