'तिने' विमानात बाळाला दिला जन्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2016 09:56 IST2016-04-29T09:56:20+5:302016-04-29T09:56:20+5:30

सिंगापूर ते यानगॉन या हवाई प्रवासा दरम्यान विमानातच एका महिलेने मुलाला जन्म दिला. ही महिला म्यानमारची नागरीक आहे.

She gave birth to baby in the plane | 'तिने' विमानात बाळाला दिला जन्म

'तिने' विमानात बाळाला दिला जन्म

ऑनलाइन लोकमत 

सिंगापूर, दि. २९ - सिंगापूर ते यानगॉन या हवाई प्रवासा दरम्यान विमानातच एका महिलेने मुलाला जन्म दिला. ही महिला म्यानमारची नागरीक आहे. जेटस्टार एशिया ३ के ५८३ फ्लाईट मध्ये २२ एप्रिलला ही प्रसूती झाली. विमान उतरत असताना या महिलेला प्रसूती कळा सुरु झाल्या. 
 
सुखरुप प्रसूतीसाठी या महिलेला विमानाबाहेर आणण्याची तयारी सुरु असतानाच या महिलेने मुलाला जन्म दिला. यावेळी विमानातील क्रू सह तीन डॉक्टरांनी सुखरुप प्रसूतीसाठी मदत केली. महत्वाच्या क्षणी विमानातील क्रू ने केलेल्या सहकार्याची जाणीव ठेऊन या महिलेने मुलाला  विमान कंपनीचेच 'सॉ जेट स्टार' असे नाव ठेवले आहे. 
 
मुलाच्या रडण्याचा आवाज कानावर पडताच विमानातील सर्व प्रवाशांनाच आनंद झाला असे जेट स्टारच्या प्रवक्त्याने सांगितले. मुलगा सहा पाऊंडाचा असून, आई आणि बाळ दोघेही सुखरुप आहेत.  
 

Web Title: She gave birth to baby in the plane