इसिसने चिमुरड्याला उडवले
By Admin | Updated: July 15, 2015 00:10 IST2015-07-15T00:10:45+5:302015-07-15T00:10:45+5:30
इसिस वा इस्लामिक स्टेट या नावाने ओळखल्या जाणाऱ्या क्रूर दहशतवादी संघटनेने आपल्या क्रौर्याचे शिखर गाठले असून, आपल्या दहशतवाद्यांना

इसिसने चिमुरड्याला उडवले
बैरुत : इसिस वा इस्लामिक स्टेट या नावाने ओळखल्या जाणाऱ्या क्रूर दहशतवादी संघटनेने आपल्या क्रौर्याचे शिखर गाठले असून, आपल्या दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यासाठी एका अनाथ चिमुरड्या मुलाला बॉम्ब लावून त्याचा स्फोट घडवून आणला आहे. थरकाप उडविणारी ही घटना इराकच्या सलाहुद्दीन प्रांतातील एका प्रशिक्षण शिबिरात घडली आहे. इराकमधील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार बॉम्बस्फोटात मरण पावलेल्या मुलाचे वय ५ ते १० वर्षांच्या दरम्यान आहे.