शरीफ यांच्या हत्येचा ‘रॉ’ने कट रचल्याचा कांगावा
By Admin | Updated: October 18, 2015 22:25 IST2015-10-18T22:25:57+5:302015-10-18T22:25:57+5:30
‘रॉ’ या भारतीय गुप्तचर संघटनेने पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या हत्येचा कट रचल्याचा संतापजनक कांगावा पाकिस्तानने केला असून, हा कथित कट लक्षात घेऊन त्यांची सुरक्षा आणखी वाढविली आहे.

शरीफ यांच्या हत्येचा ‘रॉ’ने कट रचल्याचा कांगावा
इस्लामाबाद : ‘रॉ’ या भारतीय गुप्तचर संघटनेने पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या हत्येचा कट रचल्याचा संतापजनक कांगावा पाकिस्तानने केला असून, हा कथित कट लक्षात घेऊन त्यांची सुरक्षा आणखी वाढविली आहे.
पाकिस्तानी गुप्तचर खात्याने याबाबत कळविल्यानंतर पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील गृहमंत्रालयाने शरीफ यांची सुरक्षा वाढविण्याचा आदेश सुरक्षा संस्थांना दिला आहे. पाकिस्तानी पंजाब प्रांताच्या गृहमंत्रालयाने शनिवारी जारी केलेल्या पत्रकात ‘रॉ’ने शरीफ व अन्य नेत्यांच्या हत्येचा कट रचल्याचा दावा करण्यात आला आहे.