शरीफ म्हणाले, बुरहान ‘शहीद’

By Admin | Updated: July 16, 2016 08:20 IST2016-07-16T02:51:20+5:302016-07-16T08:20:11+5:30

काश्मिरात चकमकीत मारला गेलेला हिज्बुलचा अतिरेकी बुरहान वनी याला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी शहीद संबोधले.

Sharif said, 'Burah' Shaheed ' | शरीफ म्हणाले, बुरहान ‘शहीद’

शरीफ म्हणाले, बुरहान ‘शहीद’

इस्लामाबाद : काश्मिरात चकमकीत मारला गेलेला हिज्बुलचा अतिरेकी बुरहान वनी याला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी शहीद संबोधले. भारतीय सुरक्षा दलाकडून काश्मिरात नागरिकांविरुद्ध जे अत्याचार केले जात आहेत त्याविरुद्ध १९ जुलै रोजी काळा दिवस पाळण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
काश्मीरच्या मुद्यावर लाहोरमध्ये बोलावलेल्या बैठकीत ते म्हणाले, काश्मिरी नागरिकांचे स्वातंत्र्याचे आंदोलन आहे. काश्मिरी नागरिक आपला अधिकार मिळवतील, पाकिस्तान त्यांच्या पाठीशी आहे. दरम्यान, भारताने हा आमचा अंतर्गत मामला असल्याचे म्हटले आहे.

Web Title: Sharif said, 'Burah' Shaheed '

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.