शांघाय विमानतळावर बॉम्बस्फोट, तीन जखमी
By Admin | Updated: June 13, 2016 06:34 IST2016-06-13T06:34:12+5:302016-06-13T06:34:12+5:30
शांघाय पुडोंग आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी रात्री २.२० वाजता झालेल्या बॉम्बस्फोटात तीन प्रवासी जखमी झाले

शांघाय विमानतळावर बॉम्बस्फोट, तीन जखमी
बीजिंग : चीनच्या शांघाय पुडोंग आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी रात्री २.२० वाजता झालेल्या बॉम्बस्फोटात तीन प्रवासी जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. चेक इन काउंटर टर्मिनल २ येथे हा गावठी बॉम्बचा स्फोट झाला, असे शांघाय एअरपोर्ट अॅथॉरिटीने सांगितल्याचे सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने म्हटले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.