शेक्सपिअरच्या मृतदेहाची कवटी दफनभूमीतून झाली चोरी
By Admin | Updated: March 26, 2016 16:06 IST2016-03-26T15:14:45+5:302016-03-26T16:06:44+5:30
प्रसिद्ध साहित्यिक, नाटककार विल्यम शेक्सपियर यांची कवटी दफनभूमीतून चोरीला गेली असल्याची माहिती समोर येत आहे.

शेक्सपिअरच्या मृतदेहाची कवटी दफनभूमीतून झाली चोरी
>ऑनलाइन लोकमत -
लंडन. दि. २६ - प्रसिद्ध साहित्यिक, नाटककार विल्यम शेक्सपियर यांची कवटी चोरीला गेली असल्याची माहिती समोर येत आहे. पुरात्तव खात्याने ही माहिती दिली आहे. होली ट्रिनिटी चर्चमध्ये विल्यम शेक्सपियर यांच्या मृतदेह दफन करण्यात आला होता. माहितीपटासाठी संशोधकांनी रडारच्या माध्यमातून दफनभुमी स्कॅन केले असताना ही माहिती समोर आली आहे. विल्यम शेक्सपियर यांच्या मृतदेहासंबंधी याअगोदरही अनेक बातम्या समोर आल्या होत्या. 1974 मध्ये चोरांनी शेक्सपियर यांची कवटी चोरल्याची बातमीदेखील समोर आली होती.